Sujay Vikhe : राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) घोषणा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढत आहे. यातच अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवल्याने नगर जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
त्यांनी शिर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना संगमनेर किंवा राहुरी या दोन्हीपैकी एका ठिकाणावरून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर आता मी उमेदवारीसाठी हट्ट केलेलं नाही. संगमनेर (Sangamaner) विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार निवडणून आला पाहिजे असं सुजय विखे यांनी म्हंटले आहे.
राज्यात महायुतीची सत्ता आण्यासाठी संगमनेर तालुक्यात महायुतीमधून जे कोणी इच्छुक असतील त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपले म्हणणे सादर करावे असेही सुजय विखे म्हणाले. तर शिवाजी कर्डिले हे (Shivaji Kardile) राहुरीचे माजी आमदार आहेत. पक्ष श्रेष्ठींकडे जो निर्णय योग्य वाटेल तो होईलच मात्र कर्डिले यांच्यात नेतृत्वाखाली मी आज वरती राजकारण केलं. त्याच नेतृत्वाच्या अधीन राहून मी भविष्यातही काम करणार अशी प्रतिक्रिया सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्याकडून पराभव झाला होता. तर आता माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. शिर्डीमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी संगमनेर किंवा राहुरी या दोन्हीपैकी एका ठिकाणावरून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली. संबंधित मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांमध्ये समन्वयनही झाला तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे असं विखे म्हणाले होते.
यावर बोलताना विखे म्हणाले की, मी उमेदवारीसाठी हट्ट केलेलं नाही. संगमनेरमधून महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. महायुतीची सत्ता आणण्यासाठी संगमनेर तालुक्यातील जे कोणी इच्छुक असतील महायुतीमधून त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपले म्हणणे सादर करावे. तसेच शिवाजी कर्डिले हे राहुरीचे माजी आमदार आहेत. पक्ष श्रेष्ठींकडे जो निर्णय योग्य वाटेल तो होईलच मात्र कर्डिले यांच्यात नेतृत्वाखाली मी आज वरती राजकारण केलं. त्याच नेतृत्वाच्या अधीन राहून मी भविष्यातही काम करणार असं सुजय विखे यांनी स्पष्ट केले.
Paris Olympics : भारतीय हॉकी संघाचा ऐतिहासिक विजय, 52 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव
संगमनेरमधून महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे. महायुतिमध्ये तीन घटक पक्ष आहे. यामध्ये भाजप देखील आहे. सर्वसामान्य जनता जी काही मागणी करेल त्यांना उमेदवारी द्यावी लागेल असेही सुजय विखे म्हणाले.