Download App

‘मला कृषी खात्यासाठी आग्रह होता, पण…’; छगन भुजबळांनी फोडला राजकीय बॉम्ब!

Chhagan Bhujbal On Agriculture Minister Post : फडणवीस मंत्रिमंडळातील फेरबदल आणि माणिकराव कोकाटेंकडून (Manikrao Kokate) कृषी खाते काढून घेतलंय. त्यानंतर आता राज्यात राजकीय चर्चा सुरु असताना, छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) एक महत्त्वाचं वक्तव्य करत लक्ष वेधून घेतलं आहे. माझ्याकडे कृषी खाते देण्याचा आग्रह होता, पण मीच ग्रामीण भागातील लोकांना द्यायला (Agriculture Minister Post) सांगितलं, असं भुजबळ म्हणाले आहेत.

कृषी खात्याचा आग्रह, पण नकार भुजबळांचा

नाशिकमध्ये बोलताना भुजबळ म्हणाले, माझं संपूर्ण आयुष्य मुंबईत गेलं आहे. मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उभा राहतो, पण त्यांचे बारीकसारीक प्रश्न ग्रामीण भागातील लोकांनाच अधिक चांगले कळतात. त्यामुळे कृषी खात्यासाठी भरणे मामा यांना संधी देणं (Maharashtra Politics) योग्य ठरेल, असं मीच सांगितलं. मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह खूप होता, पण मी स्वतःहून टाळलं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच खातेवाटपाबाबत निर्णय घेतात. मी फारसं बोलणं योग्य नाही. यावेळी भुजबळांनी कोकाटे यांच्या खात्याच्या बदलावर थेट टीका न करता संयम राखला.

टिळक-साठेंच्या कार्याचा गौरव रंगावलीतून! विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा सोहळा, जाधवर संस्थेचा आगळावेगळा उपक्रम

भरणे मामा ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यामुळे ते शेतकऱ्यांना अधिक चांगली मदत करू शकतात. खातं कुठलंही असो, त्यात न्याय देणं महत्त्वाचं असतं. भरणे मामा यांना काही अडचण येईल असं वाटत नाही, असं स्पष्ट मत भुजबळांनी मांडलं.

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर चिंता

गेल्या 15 दिवसांत मालेगाव आणि इतर दोन बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या आरोपींबाबत भुजबळ यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. 15-17 वर्ष तुरुंगात घालवून शेवटी ‘तुम्ही निर्दोष आहात’ असं सांगितलं जातं. साध्वी आणि इतर वर्षानुवर्षे आत राहिले. यात काहीतरी गडबड आहे. पोलीस तपास यंत्रणांमध्ये दोष असण्याची शक्यता आहे. न्यायव्यवस्थेत बदल करायची गरज आहे का? याचा सर्वांनी विचार केला पाहिजे, असं म्हणत त्यांनी न्यायप्रणालीवर कठोर प्रश्न उपस्थित केले.

‘प्रवेश नाही मिळाला… तर संपवतो!’ गरीब आईवडील अजित पवारांना भेटले अन् …

कोर्टाने सर्व काही पडताळून पाहिलं आहे. पण चुकीची माणसं पकडली जात आहेत. दिल्लीपासून महाराष्ट्रातील अनेक संस्था वेगवेगळ्या प्रकरणांचा तपास करतात. यामुळे सामान्य माणसाचे आयुष्य उध्वस्त होत आहे. तरीही लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.

 

follow us