Download App

‘समितीसमोर माझी बाजू मांडेल, मीडियाशी बोलायची…; IAS पूजा खेडकरांची प्रतिक्रिया

आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीसमोर माझी बाजू मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. -पूजा खेडकर

  • Written By: Last Updated:

Pooja Khedkar : वादग्रस्त IAS पूजा खेडक (Pooja Khedkar) यांच्या कारनाम्यांमुळे त्यांची सध्या देशभरात त्यांची चर्चा आहे. राज्य सरकारची नियमावली असतानाही त्यांनी आपल्या ऑडी कारवर (Audi car) लाल दिवा लावला होता. त्यामुळे त्यांची वाशिमला बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांनीही हातात बंदूक घेऊन शेतकऱ्यांवर दादागिरी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर बोलल्या.

Anant-Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यातील ईशा अंबानीचा ग्लॅमरस अंदाज 

आज पहिल्यांदा पूजा खेडकर माध्यमांसमोर आल्या. यावेळी त्यांना त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, माझ्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. त्यामुळे त्या समितीसमोर माझी बाजू मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मला मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही. मी तुमच्यासोबत सध्या बोलू शकत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं.

मोठी बातमी : नेपाळमध्ये ‘प्रचंड’ सरकार पडलं, विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर दहल पायउतार 

मनोरम शर्मा यांनी हातात बंदुक घेत शेतकऱ्यांना धमकावलं, याविषयी विचारलं असता पूजा यांचा खेडकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना गांभीर्याने उत्तर न देता मी तुमच्याशी अधिक बोलू शकत नाही. मला तुमच्याशी बोलण्याची परवानगी नाही, असं पालुपद अखेरपर्यंत त्यांनी लावलं.

दरम्यान, पूजा खेडकर ह्या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. गेल्या जून महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. त्या नगर जिल्ह्यातील पाथर्डीमधील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. ‘आयएएस’ होण्यासाठी अंशत: अंध असल्याचे प्रमाणपत्र आणि ओबीसी जातीचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पूजा खेडकर यांचा पोलिसांवर दबाव
याशिवाय, नवी मुंबई पोलिसांच्या अहवालानुसार खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांवर त्यांच्या एका नातेवाईकाला सोडण्यासाठी दबाव आणला होता. स्टील चोरीच्या प्रकरणात या नातेवाईकाला अटक करण्यात आली होती. त्याला सोडण्यासाठी पूजा खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांच्या डीसीपींना फोन करून दबाव टाकला होता, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

follow us