मोठी बातमी : नेपाळमध्ये ‘प्रचंड’ सरकार पडलं, विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर दहल पायउतार

  • Written By: Published:
मोठी बातमी : नेपाळमध्ये ‘प्रचंड’ सरकार पडलं, विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर दहल पायउतार

Nepal PM Prachanda loses trust vote : नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ (Pushpa Kamal Dahal) यांना मोठा झटका बसला असून, संसदेतील विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर प्रचंड यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिली आहे. 19 महिने सत्तेत राहिल्यानंतर प्रचंड यांना पायउतार व्हावे लागले.

माजी पंतप्रधान केपी शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएलने प्रचंड यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने प्रचंड यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. मात्र, संसदेत दहल यांना विश्वासदर्शक ठरवा जिंकता आला नाही. माहितीनुसार पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

केपी शर्मा ओली होणार नवे पंतप्रधान

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर आता नेपाळचे नवे पंतप्रधान केपी शर्मा होऊ शकतात. 275 सदस्यीय प्रतिनिधी सभागृहात प्रचंड यांनी मांडलेल्या ठरावाला केवळ 63 सदस्यांनी पाठिंबा दिला, तर 194 सदस्यांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे आता नेपाळी काँग्रेस-समर्थित सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली नवीन पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत.

पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या सरकारला डिसेंबर 2022 पासून 5 वेळा विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले आहे. सभापती देवराज घिमिरे यांनी प्रचंड यांच्या पराभवाची घोषणा केल्यानंतर सदस्य केपी शर्मा ओली यांचे अभिनंदन करताना दिसले.

तर आता ओली आणि नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देउबा सर्व खासदारांच्या सह्या घेऊन अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

नेपाळमध्ये कहर; मुसळधार पावसामुळे त्रिशूली नदीत दोन बस वाहून गेल्या, 65 जण बेपत्ता

ओली यांच्याकडे सध्या 167 सदस्यांचा पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे. नियमानुसार नवीन सरकारने स्थापनेच्या 30 दिवसांच्या आत संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकला पाहिजे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube