Download App

“पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग, एम्स बोर्डाचंही प्रमाणपत्र”, कोर्टात नेमकं काय घडलं..

पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात केला.

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या (IAS Pooja Khedkar)अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात (New Delhi) सुनावणी झाली. पुजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा वकिलांनी न्यायालयात केला. ज्यावेळी आम्ही ‘Puja’ नाव बदलून ‘Pooja’ असं केलं त्यावेळी गॅझेट नोटिफिकेशन केलं होतं असा दावा पूजा खेडकरच्या वकिलांनी केला. तसेच आपल्याला मिळालेलं दिव्यांग प्रमाणपत्र एम्स बोर्डाने दिलं आहे मग त्यात फ्रॉड काय? असा सवाल विचारण्यात आला. मी लैंगिक छळाची तक्रार केल्यानेच मला अशा पद्धतीने टार्गेट केलं जात असल्याचा दावा पूजा खेडकर यांनी केला. दरम्यान, न्यायालयाने पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीनावर निकाल राखून ठेवण्यात आला आहे. कोर्ट उद्या सायंकाळी यावर निर्णय देणार आहे.

पूजा खेडकर नवीन प्रकरणामुळे चर्चेत, पालिकेचा इशारा, नाहीतर संपत्तीचा होणार लिलाव

खेडकर यांच्या अटकपूर्व जामीनावर तत्काळ सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. पण कोर्टाने ही मागणी मान्य केली नव्हती. त्यानंतर अखेर आज सुनावणी झाली. पूजा खेडकर यांच्यावतीने अॅड. बीना माधव यांनी बाजू मांडली. पूजा खेडकर यांच्या वकिलांनी सांगितलं की पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग आहेत. त्यांना जे दिव्यांगत्व प्रमाणपत्र एम्सच्या बोर्डाने दिलं आहे मग त्यात फ्रॉड काय असू  शकतो, असा दावा करण्यात आला.

पूजा खेडकरांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष आला आहे. परीक्षार्थी होण्यासाठीही तिला कायम संघर्ष करावा लागला. आम्ही पाच अटेम्प्ट चांगल्या हेतूनेच दिल्या होत्या. पूजा दिव्यांग आहे. तिच्या आई वडिलांचाही घटस्फोट झाला आहे. ती दिव्यांग आहे म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल केला का असा दावा पूजा खेडकरांच्या वकिलांनी युक्तिवादात केला.

पंतप्रधान कार्यालय ते पुणे पोलीस.. सगळ्यांना कामाला लावून IAS पूजा खेडकर गेल्या तरी कुठे?

यानंतर कोर्टानेही काही प्रश्न विचारले. तुम्ही जर म्हणत आहात की तीन अतिरिक्त अटेम्प्ट देण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिल होती तर मग एक करून दाखवून द्या की तुम्हाला परवानगी कशी मिळाला होती. उच्च न्यायालयाचे निकालपत्र दिव्यांगत्वाविषयी आहे असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यावर पूजा खेडकर यांनी मी जेव्हा यूपीएससीची परीक्षा दिली तेव्हा प्रत्येक वेळी उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा आधार घेतला होता असे उत्तर पूजा खेडकर यांनी न्यायालयात दिले.

पूजा खेडकरांचा युक्तिवाद काय ?

माझी बाजू ऐकून घेण्यात आलेली नाही. मला ज्या दिवशी नोटीस मिळाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी माझी कोठडीतच का चौकशी करायची आहे? मी लैंगिक छळाची तक्रार केली म्हणूनच मला टार्गेट केलं जात आहे. माहिती लपवणं आणि खोटी माहिती देणं हा आरोप आमच्यावर लावला जाऊ शकतो.

follow us