Download App

पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल तर…, नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर CM फडणवीसांचा इशारा

CM Devendra Fadnavis On Nagpur Violence : राज्यात गेल्याकाही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेबाची

  • Written By: Last Updated:

CM Devendra Fadnavis On Nagpur Violence : राज्यात गेल्याकाही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी राज्यातील विविध भागात सोमवार 17 मार्च रोजी आंदोलने करण्यात आली. नागपूर शहरात देखील या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. शहरातील महाल भागात सोमवारी रात्री दोन गटात राडा झाला आणि यानंतर दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली.

या घटनेनंतर नागपूरमध्ये संचारबंदी (Nagpur Violence) लागू करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करुन 80 जणांना अटक देखील केली आहे. तर आता या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी नागपूरच्या जनतेला शांतता बाळगण्याच आवाहन केलं आहे.

नागपूरच्या महाल भागात जी काही घटना घडलेली आहे, ती अतिशय अयोग्य असून अशा प्रकारे जमाव जमा होऊन दगडफेक होण अत्यंत चुकीच आहे. माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की, सर्वांना कायदा-सुव्यवस्थेच पालन करावं. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवाीस म्हणाले. तसेच नागपूर शहर हे एकोप्याने रहाणार शहर आहे. त्यामुळे कोणीही शांतता भंग करु नये. मी स्वत: परिस्थितीवर पूर्ण नजर ठेऊन आहे. असं देखील म्हटले आहे.

पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल तर…

मी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलय आहे की, जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल तर ते अत्यंत गांर्भाीयने घेतलं जाईल. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, सर्वांनी शांतता ठेवावी असं आवाहन देखील त्यांनी यावेळी नागपूरकरांना केली आहे.

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, 80 जणांना अटक, ‘या’ भागात भागांमध्ये संचारबंदी लागू 

तर दुसरीकडे पोलिसांनी नागपुर शहरात कलम 144  लागू करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या भागात फक्त वैद्यकीय कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे. तसेच संचारबंदी लागू करण्यात आल्याने पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहे.

follow us