नागपूर का पेटलं? ‘कबरीचा वाद, पोलिसांवर दगडफेक’ काय-काय घडलं, वाचा सविस्तर…

Aurangzeb Tomb Controversy Dispute Between Two Group In Nagpur : औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याचे संतप्त पडसाद संपूर्ण राज्यात उमटल्याचं राहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर नागपुरात (Nagpur) आज मोठा राडा झालाय. नागपूरच्या महाल परिसरातील शिवाजी चौक आणि परिसरात तणावाचं वातावरण आहे. आज सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी या ठिकाणी निदर्शने केली (Aurangzeb Tomb Controversy) होती. औरंगजेबाचा प्रतीकात्मक पुतळाही जाळण्यात आला. संध्याकाळी शिवाजी चौकाजवळील चिटणीस पार्क परिसरात दगडफेक झाली. काही वाहनांचं नुकसान झाल्याचं देखील वृत्त आहे.
मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त
सध्या पोलिसांनी शिवाजी चौक आणि चिटणीस पार्कजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण आहे. संध्याकाळी 7 ते 7.30 च्या दरम्यान, मोठ्या संख्येने मुस्लिम तरुण (Nagpur News) शिवाजी चौकात पोहोचले अन् घोषणाबाजी करू लागले. विश्व हिंदू परिषदेने दुपारी केलेल्या निदर्शनांवर ते संतापले. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील हिंदू गटातील तरुणांनीही घोषणाबाजी सुरू केली. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना वेगळे केलंय. सर्वांना शिवाजी चौकातून चिटणीस पार्ककडे परत नेण्यात आलंय.
औरंगजेबच्या कबरीचा वाद चिघळला ! दगडफेक अन् जाळपोळ, नागपुरात दोन गटांत तुफान राडा…
अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या
चिटणीस पार्कच्या पलीकडे असलेल्या भालदारपुरा भागातून पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर मोठे दगडफेक होत असल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. दगडफेकीत काही वाहनांचेही नुकसान झाल्याचं सांगण्यात येतंय.
खुशखबर! सोशल मीडिया इन्फ्लुएंसरवर पैशांचा पाऊस पडणार, सरकारकडून 1 अब्ज डॉलर्सच्या निधीची घोषणा
आंदोलक चाकू, दगड फेकून मारत आहेत
या राड्यामध्ये काही पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान देखील जखमी झाले आहेत. आंदोलक चाकू, दगड फेकून मारत असल्याची प्रतिक्रिया जखमी जवानांनी दिली आहे. जे हातात येईल ते फेकून जवान मारत आहे. आम्ही आग विझवत होतो, पोलीस मागे होते. परंतु आमच्यावर आंदोलक दगडफेक करतच होते, अशी आपबिती अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितली आहे. पोलीस परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत, परंतु संतप्त जमाव शांत होण्याचं नाव घेत नसल्याचं सांगितलं जातंय.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शांततेचं आवाहन केलं
नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. या परिस्थितीत प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना केलंय. ते म्हणाले की, आम्ही सतत पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहोतय नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. ते एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होते. ही नागपूरची चिरंतन परंपरा आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केलंय.