Download App

पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस! कोकण, मध्य महाराष्ट्र अन् विदर्भाला अलर्ट जारी…

IMD Weather Update Heavy Rain Alert In Maharashtra : गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्यानंतर काही दिवस हवामान कोरडे राहिले होते. परंतु, आता राज्यात पावसाचे पुनरागमन होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला (Maharashtra Rain) आहे. आजपासून 29 ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून (Weather Update) करण्यात आले आहे.

29 ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी होते. याउलट गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा (Maharashtra Rain) पाऊस होत आहे. रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाच्या सरी कोसळल्या. हा पाऊस 29 ऑगस्टपर्यंत सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आजचे राशीभविष्य : मेष-वृषभ राशींसाठी लाभदायक, कोणाला घ्यावी लागेल खबरदारी?

कोकणात ‘यलो अलर्ट’

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात राज्यभर पावसाची तीव्रता वाढेल. विशेषतः दक्षिण कोकणात आजपासून ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. मंगळवार व बुधवारी उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातही पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार, शरद पवारांचं थेट मुख्य सचिवांना पत्र

हवामानातील बदलाचे कारण

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मॅडेन ज्युलियन ऑसिलेशनच्या प्रभावामुळे ईशान्य मध्य प्रदेश आणि त्याच्या आसपास कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे 25 ते 30 ऑगस्टदरम्यान कोकण व गोवा येथे मुसळधार पावसाचा इशारा आहे. तसेच 27 ते 30 ऑगस्टदरम्यान मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडू शकतो. 28 ऑगस्ट रोजी कोकण-गोव्यात पावसाची तीव्रता वाढेल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर गुजरातमध्येही या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. गुजरातमधील या पावसाचा परिणाम उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या हवामानावर होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

 

follow us