Download App

‘त्यांना पोलीस डिपार्टमेंटकडून हवं तितकं मिळत नाही…’ इम्तियाज जलील यांचे शिरसाटांवर गंभीर आरोप

Imtiaz Jalil On Sanjay Shirsat Allegations On Police : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी (Imtiaz Jalil) हल्लाबोल केलाय. गुन्हेगारीवरून संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. यावरच इम्तियाज जलील यांनी विचारलं की, इतकी कोणती लाचारी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीच असं म्हणत असतील, तर सामान्य लोकांनी काय करायचं?

फक्त आरोप करून चालणार नाही. कोणते पोलीस आहे ते दाखवावे. तुम्ही स्वतःला सिनेमानंतर मीच आहे म्हणतात, तर पोलिसांची मीटिंग बोलवा. त्यात स्पष्ट करा. पोलिस तुम्हाला भाव देत नाही म्हणून तुम्ही असे आरोप (Maharashtra Politics) करतात का? पोलिस डिपार्टमेंट कडून तेवढे मिळत नसेल म्हणून असे करतात का?

“सरदार पटेल त्याचवेळी POK ताब्यात घेणार होते, त्यांचं ऐकलं असतं तर..”, PM मोदींनी सांगितला काँग्रेसचा इतिहास

फक्त आरोप करणे योग्य नाही. आपण कुठेतरी कमी पडत आहे. कोणाला दोष द्यायचा, तर पोलिसांवर ढकलून द्यायचं. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहेच. परंतु तुम्ही पालकमंत्री आहात, तुमच्याकडे अधिकार आहेत. तुम्ही सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करू शकता. पोलीस तुम्हाला भाव देत नाही का? तुमची काही मागणी त्यांनी पूर्ण केली नाही का? म्हणून तुम्ही हे सगळे आरोप करीत आहात, अशी टीका इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर केली आहे.

बहुतेक त्यांना जितकं पोलीस डिपार्टमेंटकडून हवंय, त्यांना तितकं मिळत नसेल त्यामुळे शिरसाट यांनी असं वक्तव्य केलं असेल, असं देखील जलील यांनी म्हटलंय.
मागील काही दिवसांत छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दरोडे अन् चोऱ्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यामध्ये काही पोलिसांचा सहभाग होता, असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यावरूनच आता इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केलाय.

कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, नवा व्हेरिएंट किती धोकादायक? ICMR ने दिले महत्त्वाचे अपडेट

मनपा निवडणुकीचं बिगुल वाजलंय, यावर इम्तियाज जलील यांनी म्हटलंय की, निवडणूक आल्यानंतर मुद्दे काय आहेत, हे सगळ्यांना माहिती असतं. मात्र, ज्यांना काहीही करायचं नसतं, ते जातीवर निवडणूक लढवितात. मात्र, आम्ही आमचा अजेंडा ठरविला आहे. आमचा अजेंडा विकास आहे. आमचा पहिला ठराव देशी दारू बंद करणार, असा आहे. दुसरा ठराव पाणी असून मनपा पूर्ण 30 दिवसाचा पाणीकर घेते. मात्र, पाणी काही दिवस देतात. मात्र, आमची सत्ता आल्यास आम्ही जेवढे दिवस पाणीपुरवठा तेवढे दिवसच कर घेतले जाईल, असं देखील त्यांनी म्हटलंय. आमची तयारी पूर्ण, पूर्ण ताकतीने निवडणूक लढविणार असं जलील यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us