Worli Hit And Run : वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलीस तपासातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. (Hit And Run ) या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याच्या वडीलांना पोलिसांनी अटक केलेली. पण, मिहीरचे वडील शिवसेना उपनेते राजेश शाह यांना जामीन मंजूर करण्यात आला. (Worali Accident) याप्रकरणात पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणाप्रमाणेच धक्कादायक आणि संतापजनक खुलासे होत आहेत. या प्रकरणातही शाह कुटुंबानं मुख्य आरोपी मिहीरला वाचवण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुण्यातील अग्रवाल कुटुंबाप्रमाणेच आता याप्रकरणातही संपूर्ण शाह कुटुंब दोषी असण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सध्या फरार मिहीरचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
चमकोगिरीचा हव्यास नडला; पुण्यातील अधिकारी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली
आरोपीकडून वरळी हिट अँड रन प्रकरणात ज्या गाडीने अपघात झाला ती मुख्य गाडीच लपवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. तसंच, आरोपीच्या वडिलांकडून गाडीची नंबर प्लेट बदलण्याचा प्रयत्न झाल्याचीही माहिती पोलीस तपासात समोर आलं आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळाचं सीसीटीव्ही फुटेजही तपासलं होतं. तसंच, मिहीरनं ज्या-ज्या रस्त्यांवरुन पळून जाताना गाडी नेली, त्या-त्या ठिकाणचेही सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले आहेत. या सीसीटीव्हीमधून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक गोष्ट समोर आली आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, शिवसेना उपनेत्याचा मुलगा मिहीर शाह यानं मुलानं कावेरी नाखवा यांना गाडीनं धडक दिल्यानंतर त्यांना दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं होतं. पुढे जाऊन वरळी सीलिंक येथे मिहीरनं गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी बंपरमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढलं, ड्रायव्हर राजऋुषी गाडीच्या स्टेअरिंगवर बसला. त्यावेळी दोघांनी गाडी बाजून घेऊन जाणं अपेक्षित होतं. मात्र, त्यानं गाडी पाठीमागे घेतली आणि थेट कावेरी यांच्या अंगावर घालून तिथून पळ काढला. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.