Download App

Video : टॉवेल इतकीच शाल अन् कर्मचाऱ्यांना ‘रोबोट’चा धाक, ‘टेक-वारी’त अजितदादांची टोलेबाजी

टेक-वारी  महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

Inauguration of Maharashtra Tech Learning Week : शाल कुठून आणली, टॉवेल इतकीच शाल आणली का?  म्हणत गोपाल दास महाराजांचं अगं झाकल इतकी तर द्यावी. इतकी काटकसर असे काही भाविक आहेत. (Maharashtra) जे वारीत हेलिकॉप्टरने येतात. मुक्काम करतात. वारीत सहभागी होतात, असं म्हणत अजित पवारांनी जोरदार टोलेबारी केली. यावेळी अजित पवारांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना उद्देशून भाषण करताना नॅपकिन, मिसळ आणि उद्घाटन कात्रीवरून चिमटा काढला. ते टेक-वारी  महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचे उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

अजित पवारांना शरद पवार राजकीयदृष्ट्या कधीच;संजय राऊतांचं खळबळजनक राजकीय विधान

गोपाल दास महाराजांचं अगं झाकल इतकी तरी शाल द्यावी

गोपाल दास यांच्या स्वागतावेळी टॅावेल आकाराची शॅाल देण्यात आली. यावरूनही अजित पवारांनी टोला लगावला. शाल कुठून आणली, टॉवेल इतकीच शाल आणली का?  असे विचारत निदान गोपाल दास महाराजांचं अगं झाकलं इतकी तर द्यावी. इतकी काटकसर असा प्रश्न उपस्थित करत टॉवेल आकाराची शाल दिली नसती तरी परवडलं असतं. किती काटकसर चालली आहे ते मी बघत होतो, आपलंच सरकार आहे, असे अजित पवार म्हणाले.

….तर तुमच्या जागी रोबत येईल

कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी रोबोटने अजित पवारांना कात्री आणून दिली, त्याचा संदर्भ देत नीट काम करा नाहीतर तुमच्या जागी रोबोट येईल असे म्हणत दादांनी मंत्रालायातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चिमटा काढला.  कॅबिनेटच्यावेळी आहाराचा विचार व्हायला हवा. फक्त मिसळच दिली जाते. आता मी सुजाता सौनिक यांना सांगणार आहे की, पुढच्यावेळी आहाराची जबाबदारी व्ही. राधा यांना सांगा, असे अजित पवार यांनी म्हटले. मी कार्यक्रमाला आलो तर आज वेळेत कात्री मिळाली. नेहमी कात्री शोधावी लागते. पण, आज रोबोटने बरोबर कात्री आणून दिली. बघा किती बरोबर काम रोबोट करतोय ते. त्यामुळे तुम्ही पण नीट काम करा, नाहीतर तुमच्या सगळ्यांची जागा पण रोबोटच घेईल, अशा शब्दात अजित पवारांनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमातून चिमटे काढले.

‘टेक वारी’ म्हणजे काय?

‘टेक वारी’ म्हणजे महाराष्ट्र शासन आयोजित पहिली डिजिटल वारी होय. आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असून ‘टेक वारी’ ही मंत्रालयातून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात आहे. या ‘टेक वारी’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्रे तसेच तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.

पहिल्या दिवशी

दि. ५ मे रोजी मंत्रालयातील त्रिमुर्ती येथे ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर प्रभु गौर गोपाल दास मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह, ६ वा मजला येथे “विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान” या विषयावर केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या श्रीमती देबजानी घोष यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत मंत्रालयातील समिती सभागृह (कक्ष ३), ७ वा मजला येथे”शासकीय कामकाज डिजिटल पद्धतीने कसे करावे” या विषयावर मायक्रोसॉफ्ट,नॅसकॉमचे श्री. मंदार कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत मंत्रालयातील परिषद सभागृह, ६ वा मजला “कृत्रिम बुद्धिमत्ता” याविषयी नवी दिल्लीचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंग यांचे व्याख्यान होणार आहे.

मंगळवारी ६ मे २०२५ सकाळी

११:३० ते १२:३० परिषद सभागृह, ६ वा मजला येथे ‘तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावर परिषद सभागृह सहावा मजला येथे कृषी आयुक्त सुरज मांढरे आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास नाईक यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी २:०० ते ३:०० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे “भाषिणी-भाषेचा अडसर दूर करणे” या विषयावर डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच २:०० ते ३:०० त्रिमुर्ती प्रांगण येथे “प्रवास पाककृतींचा” या विषयावर डिजिटल जगातील महाराष्ट्रीयन पाककृतींची प्रणेती श्रीमती मधुरा बाचल यांचे व्याख्यान होणार आहे.दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत मंत्रालयातील सातवा मजला येथे समिती क्रमांक ३ मध्ये “इंटरनेट ऑफ थींग्ज (Internet of Things)” या विषयावर व्याख्यान होणार आहे.दुपारी ४:०० ते ५:०० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे “ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी” नेसकॉमचे लौकिक रग्जी यांचे व्याख्यान होणार आहे.

बुधवार ७ मे २०२५ तिसऱ्या दिवशी

सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत परिषद सभागृह, ६ वा मजला येथे ‘सायबर सुरक्षा: या विषयावर नेस्कॉमचे प्रसाद देवरे आणि सुकृत घोष यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत त्रिमूर्ती प्रांगण मंत्रालय येथे आहार तज्ञ ऋतुजा दिवेकर यांचे ‘आरोग्यदायी जीवनशैली’या विषयावर व्याख्यान होणार आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत ‘फ्रंटियर तंत्रज्ञानाद्वारे प्रशासन नव्याने परिभाषित करणे’ या विषयावर केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ३ ते ४ या वेळेत मंत्रालयातील सातवा मजला समिती सभागृह क्रमांक तीन येथे ‘स्मार्ट बैठक आयोजित करणे’या विषयावर झूम नेस्कॉमचे शैलेश रंगारी, मेहेर उल्ली पालेम यांचे व्याख्यान होणार आहे.

गुरुवार ८ मे २०२५ – चौथ्या दिवशी

सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत “शासकीय कामकाजात फ्रंटियर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर” या विषयावर परिषद सभागृह सहावा मजला मंत्रालय विस्तार येथे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, विभागीय आयुक्त नागपूरच्या विजयालक्ष्मी बिदरी, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांचे या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी २ ते ३ या वेळेत त्रिमुर्ती प्रांगण येथे”जीवन संगीत” या विषयावर जीवन संगीत समर्थक संतोष बोराडे यांचे व्याख्यान होणार आहे.दुपारी ३:०० ते ४:०० या वेळेत समिती सभागृह सातवा मजला, समिती कक्ष क्रमांक ३ येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’या विषयावर नेस्कॉमचे मनीष पोतदार,सरस्वती गोल्लेरकरी यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी ४:०० ते ५:०० परिषद सभागृह सहावा मजला येथे ‘डब्यासाठीच्या आरोग्यदायी पदार्थांच्या पाककृती’या विषयावरती केटरिंग टेक्नॉलॉजी न्यूट्रिशन, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या अन्वेषा पात्रा यांचे व्याख्यान होणार आहे.

शुक्रवार ९ मे २०२५ पाचव्या दिवशी

सकाळी १०:३० ते १:३० समिती सभागृह सातवा मजला समिती कक्ष क्रमांक ३ येथे वेळेत कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांचे “स्टार्टअप डेमो डे” या विषयी व्याख्यान होणार आहे.सकाळी ११:३० ते १२:३० या वेळेत समिती सभागृह सातवा मजला समिती कक्ष क्रमांक ३ येथे नॅसकॉमचे श्रीमती प्राजक्ता तळवेलकर, सुची गुप्ता, राहुल मुलाने यांचे “डिजिटली सजग बना” या विषयी व्याख्यान होणार आहे.महाराष्ट्राच्या संत परंपरां आणि भक्तिभावाला उजाळा देणाऱ्या “ज्ञानाची वारी” या सांस्कृतिक कार्यक्रमाने ‘टेक वारीचा’ समारोप होणार आहे. दुपारी १२.३० ते २.३० या वेळेत हा कार्यक्रम त्रिमूर्ती प्रांगण येथे होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टेक वारी या कार्यक्रमाचा समारोप दुपारी ३.०० वाजता होणार आहे. ‘फूड दॅट हील्स’ या उपक्रमांतर्गत पौष्टिक व पारंपरिक पाककृतींचे दररोज मेनू तयार केले जातील. तसेच विविध क्षेत्रातील २४ स्टार्टअप्सचे सादरीकरण होणार आहे.

follow us