Download App

खूशखबर! वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ, फडणवीसांची मोठी घोषणा

ज्य सरकारने वीज कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली.

Increase salary of electricity employees : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने (State Govt) वीज कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याची माहिती दिली. राज्य सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील महावितरण (Mahavitaran), महापारेषण (Mahapareshan) आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

भाजपच्या राजू शिंदेंचा ठाकरे गटात प्रवेश, खैरे नाराज? म्हणाले, ‘त्यांच्यामुळे माझा दोनदा…’ 

किती टक्के वाढ?
ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

आज सह्याद्री अतिथी गृहावर ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निधारण करण्याबाबच्या बैठकीत फडणवीस बोलत होते.

वचपा काढला ! षटकारांची हॅटट्रीक करत अभिषेक शर्माचे स्फोटक शतक; झिम्बाब्वेसमोर भलेमोठे ‘टार्गेट’ 

या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस काय म्हणाले? 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तिन्ही वीज कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्याचे मान्य करण्यात आले. याशिवाय, सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करीत पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणार 500 रुपयांचा भत्ता आता 1,000 रुपये करण्यात आला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

follow us