वचपा काढला ! षटकारांची हॅटट्रीक करत अभिषेक शर्माचे स्फोटक शतक; झिम्बाब्वेसमोर भलेमोठे ‘टार्गेट’

  • Written By: Published:
वचपा काढला ! षटकारांची हॅटट्रीक करत अभिषेक शर्माचे स्फोटक शतक; झिम्बाब्वेसमोर भलेमोठे ‘टार्गेट’

zimbabwe-vs-india-2024-Abhishek Sharma Century: झिम्बाब्वेविरुद्धच्या (zimbabwe vs india) टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघावर पराभवाची नामुष्की ओढवली गेली. पण दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार कमबॅक केले. भारतीय फलंदाजांनी झिम्बाव्बेच्या गोलंदाजी अक्षरशः फोडून काढत तब्बल 234 धावांपर्यंत मजल मारली.

पाठीशी घालणार नाही, दोषींवर कडक कारवाई करणार; वरळी हिट अॅंड रनप्रकरणी CM शिंदेंची प्रतिक्रिया

त्यात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) आपल्या दुसऱ्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात तुफानी शतक झळकविले. त्याने 47 चेंडूत 100 धावा केल्यात. त्यात तब्बल आठ षटकार आणि सात चौकारचा समावेश आहे. विशेष म्हणजे अभिषेक शर्माने सलग तीन षटकार मारत आपले शतक झळकविले आहे. कर्णधार शुभमन गिल दोन धावांवर बाद धावा. तर ऋतुराज गायकवाडने 77 आणि रिंकू सिंगने (Rinku Singh) 48 धावांची स्फोटक खेळी केली.

चंद्रकांत पाटलांना नातेवाईक आणि सगेसोयरे यातील फरक कळतो का? जरांगे पाटलांचे टीकास्त्र

अभिषेक शर्माचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक आहे. तर त्याने आजच्या इनिंगचे खातेही षटकार मारत खोलले असून, पहिले अर्धशतक हे 33 चेंडूत झळकविले. पहिल्या सामन्यात तो खातेही उघडू शकला नव्हता. परंतु दुसऱ्या सामन्यात ते जबरदस्त खेळला. 11 व्या षटकात डियोन मायर्सची त्याने धुलाई केली. या षटकात त्याने तब्बल 28 धावा केल्या. तर पहिल्या चेंडूवर त्याने दोन रण काढले. त्यानंतर चौकार मारला. तर तिसऱ्या चेंडूवर जबरदस्त षटकार मारत अर्धशतक झळकविले. त्यानंतर चौथ्या चेंडूवरही चौकार मारला. पाचव्या चेंडूवर षटकार मारला. तर शेवटच्या चेंडूवरही चौकार मारला. त्यानंतर अभिषेकने 13 चेंडूत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत शतक झळकविले. म्हणजे पुढच्या पन्नास धावा केवळ 13 चेंडूत काढल्या. त्यात पाच षटकार आणि दोन चौकार मारले. मसाकाजने शर्माला झेलबाद केले.


शुभमन गिल पुन्हा निराश केले

झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला मोठा झटका बसला होता. भारतीय फलंदाजांनी गोलंदाजांसमोर नांग्या टाकल्या होत्या. संपूर्ण संघ 102 धावांवर गारद झाला होता. दुसऱ्या सामन्यातही भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार शुभमन गिल हा दुसऱ्याच षटकार बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड डाव सावरला. पहिल्या सहा षटकात भारताच्या केवळ 36 धावा झाल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube