चंद्रकांत पाटलांना नातेवाईक आणि सगेसोयरे यातील फरक कळतो का? जरांगे पाटलांचे टीकास्त्र
Manoj Jarange on Chandrakant Patil : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्यात यावे आणि सरकारने सगेसोयरे (Sagesoyare)अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) करत आहेत. त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत मुदत दिली. अशातच काल मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढायची गरज नसून सरकारने ती आधीच काढलीये, असं विधान केलं. यावरून मनोज जरांगेंनी चंद्रकात पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलं.
‘पापाचा घडा लपवण्यासाठी योजनांचं पांघरून…’; लाडकी बहिण योजनेवरून ठाकरेंचा हल्लाबोल
चंद्रकांतदादा पाटील यांना सगेसोयरे आणि नातलग यातील फरक कळतो का, असा सवाल करत त्यांनी विनाकारण गैरसमज पसरवू नये, असं जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना चंद्रकांत पाटील यांनी केलेल्य वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, चंद्रकात पाटील यांनी ती अधिसूचना आधी वाचली पाहिजे. ते सरकारचे ऐकून गैरसमज पसरवत आहेत. त्या अधिसूचनेनुसार ज्यांच्या नोंदी सापडल्या आहे. त्यांच्या आधारे रक्ताच्या नात्यांना दाखले दिली जातात. पण, आमची मागणी वेगळी आहे. आम्ही सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. कारण, त्यांचा आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांचा व्यवसाय सारखचा आहे. त्यांच्या रोटी-बेटीचा व्यवहार होताो. मात्र, चंद्रकांत पाटील उलट बोलत आहेत. ते म्हणतात की, सगेसोयऱ्यांची अधिसूचना काढायची गरज नाही. नातलगांना आधीच दिलं. त्यांना सगेसोयरे अन् नातलगांमधील फरक कळतो का, असा सवाल जरागेंनी केला. चंद्रकांतदादा विनाकारण गैरसमज पसरवत असल्याचा आरोपही जरांगेंनी केला.
मराठ्यांचं वादळ पश्चिम महाराष्ट्रात येणार, जरांगेंनी बोलावली महत्वाची बैठक
धनगर आणि मराठा बांधवांत भांडणे लावली जाताहेत…
पुढं बोलतांना जरांगे म्हणाले, येवलेवाल्यांचे ऐकून धनगर आणि मराठा बांधवांत भांडणे लावली जात आहेत. मात्र धनगर आरक्षणाला आमचा विरोध नाही आणि त्यांच्या आरक्षणाला कोणी धक्काही लावणार नाही. त्यांचे ऐकून फुकट भांडण घेऊ नका. तुमच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही पाठिंबा देतो. तुमच्यासाटी आम्ही कोट्यावधी मराठाबांधव पाठीशी राहू, असं त्यांनी सांगितलं.
…सत्तेत राहू देणार नाही
राज्यात आगामी निवडणुकीत गोरगरिबांना त्रास देणाऱ्यांना पाडायचेच आहे. ओबीसी, मराठा मतदारांनी मतदान करून मोठे करायचे अन् सत्तेच्या मस्तीत राहून त्रास देत असतील तर त्यांना सत्तेच राहू देणार नाही, असा इशाराही जरागेंनी दिला.