Download App

भारत 600 कोटीत चंद्रावर पोहचला अन् इकडं…, भ्रष्टाचारावरून जयंत पाटलांचा हल्लाबोल

Jayant Patil : राहुरी येथे आयोजित शिवस्वराज्य यात्रेमध्ये बोलताना आज (27 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

  • Written By: Last Updated:

Jayant Patil : राहुरी येथे आयोजित शिवस्वराज्य यात्रेमध्ये बोलताना आज (27 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पुन्हा एकदा महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार हल्लाबोल करत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहे.

या सभेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकसभेत धनशक्ती विरोधात तुम्ही एका सामान्य माणसाला निवडणून देत संपूर्ण नगर जिल्ह्याने सामान्य माणसाची ताकद दाखवून दिली असं म्हणत त्यांनी विखे कुटुंबाला टोला लावला. तसेच प्राजक्ता तनपुरे (Prajakta Tanpure) यांनी मंत्री असताना उत्तम काम करत जनतेची सेवा केली असं देखील यावेळी जयंत पाटील म्हणाले.

भाजपने (BJP) शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी (NCP) फोडून सत्ता काबीज केली मात्र मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिळाले आणि 105 आमदार असणारी भाजप बाजूला जाऊन बसली असेही ते म्हणाले. या तिघांनी सध्या राज्यात भ्रष्टाचाराचा कळस करून दाखवला आहे. या सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी 90 हजार कोटी रुपयांची 6 रस्त्यांची कामे काढली होती. जालना – नांदेड रस्ताच्या एका किलोमीटरला खर्च 83 कोटी रुपये आणि अलिबागपासून – विरार रस्त्याच्या एका किलोमीटरचे खर्च 273 कोटी रुपये. चांद्रयान- 3 च्या मदतीने भारत 600 कोटीत चंद्रावर पोहचला अन् इकडं विरारपासून अलिबागला जायला 26 हजार कोटी रुपये सरकार मोजायला तयार आहे अशी टीका या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर केली. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार घाबरली आहे. त्यामुळे तिजोरीचे दार उघडून वाटेल ती घोषणा करत आहे असा आरोप देखील जयंत पाटील यांनी केला.

महायुतीचं ठरलं, 225 जागांवर एकमत, ‘या’ दिवशी होणार घोषणा

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचे मत फोडण्यासाठी विरोधक नवा राजकारण करत आहे. आघाडी तयारी करून त्यांना फंडिंग करण्याचे काम विरोधक करत आहे. त्यांना फक्त महाविकास आघाडीचे मत फोडायचे आहे. असाही आरोप  विरोधकांवर या सभेत बोलताना जयंत पाटील यांनी केला तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्ता तनपुरे यांना जास्त मतांनी जिंकून द्या असा आवाहन देखील त्यांनी यावेळी केला.

follow us