Download App

” ए ती लाल लाईट बंद कर ”; कार्यक्रमादरम्यान इंदुरीकर महाराजांनी दिले आदेश

Indurikar Maharaj Social Media : गेल्या काही दिवसांपासून राज्यात डान्सर गौतमी पाटील आणि कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यामध्ये चांगलच वॉर रंगल होतं. मानधनावरून तसेच लोकांच्या गर्दीवरून इंदुरीकर महाराजांनी टीका केली होती. त्यावर गौतमी पाटीलने देखील त्यांना प्रत्युत्तर दिले होते. हा सगळा प्रकार सोशल मिडीयामुळे व्हायरल झाला होता.

त्यामुळे आता याच सोशल मिडीयाची धास्ती कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी मोठा निर्णय देखील घेतला आहे. बुधवारी नांदेडमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये इंदुरीकर महाराजांनी आपल्या कार्यक्रमात थेट कीर्तनाचे व्हिडीओ काढायला मज्जव केला. तसेच त्यांनी तेथील कॅमेरे देखील बंद करायला लावल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे आज इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटील हिचा समाचार घेतला होता. वादग्रस्त किर्तनामुळे इंदुरीकर महाराज नेहमी चर्चेत असतात. इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातुन समाजप्रबोधन करतात. मात्र, इंदुरीकरांच्या कार्यक्रमात चिमुकल्यानं गौतमीच्या गाण्यावरच ठेका धरला होता. गौतमी पाटीलच्या अदाकारीनं तरूणाईसह चिमुकली पोरंही बिथरली आहेत. याचा प्रत्यय किर्तनकार इंदुरीकर महाराजांनाही आला.

Indurikar Maharaj यांच्या कीर्तनात सहभाग होता आलं नाही यांची खंत

इंदुरीकर महाराज म्हणाले, तीन गाणे वाजवून तिला तीन लाख आणि आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला म्हणून आमच्यावर आरोप होतो, अशा शब्दांत प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलचं नाव न घेता टीका केलीय. इंदुरीकर महाराज म्हणाले की, गाण्यांच्या कार्यक्रमात हाणामारी होते, काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिलं जात नाही, असं म्हणत इंदुरीकरांनी गौतमीवर जोरदार टीका केली आहे.

यावर गौतमी पाटील हिने स्पष्टीकरणही दिलं होत. महाराजांविषयी मी काय बोलणार. फक्त इंदुरीकर महाराजांचा गैरसमज झाला आहे. असं गौतमी पाटील म्हणाली. इंदुरीकर महाराज सांगतात तेवढं माझं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी देखील ध्यानात घ्यावं. मी तीन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. तीन गाण्यासाठी तीन लाख कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटीलने म्हटलं होतं.

Tags

follow us