Indurikar Maharaj यांच्या कीर्तनात सहभाग होता आलं नाही यांची खंत

Indurikar Maharaj यांच्या कीर्तनात सहभाग होता आलं नाही यांची खंत

अहमदनगर : निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर (Nivritti Maharaj Deshmukh Indorikar) यांचे कीर्तन ऐकण्यासारखे असते. समाजात काही दोष निर्माण होत असतात. त्यावर आपल्या शैलीने ते आघात करीत असतात. ते दोष दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. समाजाचं प्रबोधन करणारे त्यांच व्यक्तिमत्व आहे. माझ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने मला कीर्तनासाठी उपस्थित राहता आले नाही, अशी खंत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी व्यक्त केली.

बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होते. या सर्व कीर्तन महोत्सवात मला सहभागी होता आलं असतं तर नक्कीच आनंद झाला असता.

वारकरी संप्रादाय ही आपली संस्कृती आहे. पंढरपूरचा पांडूरंग आपलं दैवत आहेत. या दैवाताने आणि सर्व संतांनी आत्तापर्यत आपल्याला समतेच शिक्षण दिले आहे. एकमेकांशी माणसाप्रमाणे वागवे, असे शिक्षण त्यांच्या विचारातून दिले आहे. आपला संप्रादाय विश्वबंधुत्व, मानवधर्म सांगणारा आहे. त्याचा अभिमान, आनंद वाटणारा आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील हरीबाबा मंदिराजवळ माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या किर्तन कार्यक्रमासाठी सत्यजित तांबे उपस्थित राहिले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube