Ratan Tata Health News : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy) रुग्णालयातील आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आला आहे. रतन टाटा यांचा प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे.
तर दुसरीकडे आतापर्यंत रतन टाटा यांच्या प्रकृतीबाबत टाटा ग्रुपकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सोमवारी रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर वयाशी संबंधित आजारांमुळे माझी सध्या वैद्यकीय तपासणी सुरू आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मी बरोबर आहे. अशी माहिती एक्सवर रतन टाटा यांनी दिली होती.
Ratan Tata, chairman emeritus of India’s Tata conglomerate, in critical condition in hospital, sources say https://t.co/V8bbFAx5jZ pic.twitter.com/qAYOPngGzb
— Reuters (@Reuters) October 9, 2024
रतन टाटा यांनी मार्च 1991 ते डिसेंबर 2012 पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा प्रथम टाटा ग्रुपची कंपनी टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहाय्यक म्हणून रुजू झाले. त्यानंतर जमशेदपूर येथील टाटाच्या प्लांटमध्ये काही महिने प्रशिक्षण घेतले.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या हाताळण्यास सुरुवात केली. 2008 मध्ये, रतन टाटा यांना भारत सरकारने देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन सन्मानित केले.