Download App

शरद पवारांचा तातडीने अजित पवारांना फोन; नक्की काय घडलं? वाचा, का केला होता फोन?

शरद पवार यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. मात्र, ते एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये असल्यानं

Sharad Pawar Call to Ajit Pawar : राजकीय वर्तुळातून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रविवारी फोन केला होता. (Ajit Pawar) पुरंदरमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शरद पवारांनी अजित पवार यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे. पुरंदरमधील शेतकरी शरद पवारांच्या भेटीला आले होते, त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन केला.

पुरंदर विमानतळासंदर्भात शेतकऱ्यांशी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावा, यासह शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, त्यासंदर्भात बैठक घेऊन ते प्रश्न मार्गी लावा, असं शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन करून सांगितल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. मात्र, ते एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये असल्यानं शरद पवार यांचं त्यांच्याशी बोलणं झालं नाही, त्यानंतर शरद पवार यांनी लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला, अशी माहिती आहे.

शेतकऱ्यांचा विरोध याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला. पुण्याचे जिल्हाधिकारी याबाबतीत लक्ष घालत असल्याची माहिती अजित पवार यांनी शरद पवारांना दिली. दरम्यान, पुण्यात शरद पवार यांना भेटण्यासाठी आज पुरंदर येथील शेतकरी त्यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. शेतकऱ्यांनी त्यांची अडचण सांगितल्यानंतर शरद पवारांनी थेट पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना केला फोन करुन शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली.

 

follow us