Download App

पिंपरी-चिंचवडमध्ये अमानवीय घटना, चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीच्या गुप्तांगाला होल पाडून कुलूप बसवले

Pimpri-Chinchwad : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला होल पाडून कुलूप बसवल्याची धक्कादायक घटना

Pimpri-Chinchwad : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या (Wife) गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला होल पाडून कुलूप बसवल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पीडीतेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

माहितीनुसार, ही धक्कादायक घटना 11 मे रोजी घडली असून या प्रकरणात वाकड पोलीस ठाण्यात 16 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 30 वर्षीय पतीला अटक केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 मेच्या रात्री पती रागात घरी आला होता, पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर त्याने घरातील ब्लेडने पीडितेच्या गुप्तांगावर वार करत पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने पत्नीचे  हात बांधले आणि लोखंडी खिळ्याने गुप्तांगाच्या दोन्ही बाजूने होल पाडून त्यात पितळेचं कुलूप लावलं. यामुळे पत्नीला गंभीर दुखापत झाली. सध्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु असून वाकड पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणात ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,  पिंपरी चिंचवडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीस मारहाण करून अत्यंत विकृत कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.महिलेवर केलेल्या शारीरिक अत्याचाराचे स्वरूप अतिशय क्रूर आणि संतापजनक आहे.

… म्हणून माघार घेतली, छगन भुजबळांचा मोठा खुलासा, सांगितली पडद्या मागची गोष्ट

याप्रकरणी वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेत तातडीने पीडितेला योग्य ते उपचार देण्याचे तसेच तपास जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

follow us