बेडकाने छाती फुगवली तर बैल झाल्यासारखं वाटतं असतं; रुपाली चाकणकरांचा कोल्हेंवर निशाणा

  • Written By: Last Updated:
बेडकाने छाती फुगवली तर बैल झाल्यासारखं वाटतं असतं; रुपाली चाकणकरांचा कोल्हेंवर निशाणा

Rupali Chakankar On Amol Kolhe : बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गटामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांबरोबर इतर पदाधिकारी एकमेंकाना आव्हान देत आहे. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. महायुतीकडे 200 आमदार, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एवढी ताकद असतानाही मित्रपक्षाकडून उमेदवार आयात करावा लागतोय, ही कामाची पोचपावती असल्याचेही खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. त्याला आता अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सतरा हजार पोलिस भरतीपासून मराठा आरक्षणाचा आरंभ; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

बेडकाने छाती फुगवली तर बैल झाल्यासारखं वाटतं असतं. अमोल कोल्हे यांना घरासमोरचा रस्ता नीट करता आला नाही. त्यांनी मतदारसंघात काहीच केलेले नाही. ते केवळ नाटकांच्या माध्यमातून ते मतदार संघात फिरत आहेत, असे टीकास्त्र रुपाली चाकणकर यांनी सोडले आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या चाकणकर यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत भाष्य केले. निवडणुका आल्या की सर्वच पक्ष आपली उमेदवारी जाहीर करत असतात. आमचा पक्षही उमेदवारी जाहीर करेल. बारामतीत कोणीही उमेदवार असला तरी सुनेत्रा पवार सर्वाधिक मतांनी निवडून येतील, असा विश्वास चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.

Jayant Patil : शेलार अन् कदमांना समज द्या, योगेश सावंतावरून जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांना दाखवला आरसा


काय म्हणाले अमोल कोल्हे ?

महायुतीकडे जवळपास 200 आमदार, 1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री एवढी मोठी ताकद असून असं असतानाही दोन्ही उमेदवारांची नावे घेतली आहेत, त्यात शक्यता व्यक्त केल्या आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील शिंदे गटातून अजितदादांकडे येणार? किंवा प्रदीप दादा कंद भाजपमधून अजितदादांकडे येणार म्हणजेच महायुतीला मित्रपक्षाकडून उमेदवार आयात करावा लागणार आहे. हीच कामाची पोचपावती असल्याची फटकेबाजी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज