… म्हणून माघार घेतली, छगन भुजबळांचा मोठा खुलासा, सांगितली पडद्या मागची गोष्ट
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत आपला अपमान झाल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha 2024) माघार घेतली असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांच्या सांगण्यावरून मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरु केली होती मात्र माझ्या नावाची घोषणा होत नसल्याने मी स्वतः माघार घेतली असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मी स्वतःहुन नाशिक लोकसभा मतदारसंघातून तिकटी मागितले नव्हते, तुम्ही सांगितले तेव्हा मी निवडणूक लढवण्यासाठी तयार झालो आणि निवडणूही आलो असतो, मात्र राज्यात महायुतीकडून सगळ्यांचे नाव जाहीर होत होते मात्र माझ्या नावाची घोषणा झाली नाही. म्हणजेच तुम्हाला करायचं नाही, तुम्ही सांगितलं म्हणूनच तयार झालो होतो तो अपमान समजून मी माघार घेतली, असा मोठा खुलासा त्यांनी यावेळी केला.
तुम्ही छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून कस काय ?बसतात असा प्रश्न राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) विचारला होता यावर उत्तर देत छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, राज ठाकरेंनी हाच प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला पाहिजे. तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना आहे असं म्हणता, मग आता छगन भुजबळ तुमच्या मांडीला मांडी लावून का बसलेत? असं प्रश्न एकनाथ शिंदेंना देखील राज ठाकरेंनी विचारला हवा असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
पुढे राज ठाकरे म्हणाले, तुम्ही तर रक्ताचे आहात ना. मला आठवतं, बाळासाहेब मातोश्रीवर जेव्हा पर्यंत राज येत नव्हता तेव्हा पर्यंत ते जेवायचे नाहीत. राज अजून शाळेतून कसा आला नाही विचारायचे, मग तुम्ही असं का केलं? तुम्ही इकडेही असता आणि तिकडेही असता, तो मुद्दा लोकांना भावाला अशातला काही भाग नाही, मी जसा उद्धव ठाकरेंबरोबर बसलो तसा यांच्याबरोबरही बसलो, असा उत्तर देत छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला.
जेव्हा मी मोठी होत होते, मला…, भूमी पेडणेकरने सांगितला ‘तो’ किस्सा