जेव्हा मी मोठी होत होते, मला…, भूमी पेडणेकरने सांगितला ‘तो’ किस्सा

जेव्हा मी मोठी होत होते, मला…, भूमी पेडणेकरने सांगितला ‘तो’ किस्सा

Bhumi Pednekar : बॉलिवूडची (Bollywood) लोकप्रिय अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) तिच्या स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्समुळे (Fashion Sense) सोशल मीडियावर (Social media) नेहमी चर्चेत राहते. ती सध्या फॅशनच्या जगात एकामागोमाग एक धमाका करताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये अभिनयाची वेगळी छाप सोडणारी भूमीने आपल्या आयुष्यामधील फॅशनबद्दल एक किस्सा शेअर केला आहे.

भूमी म्हणाली, जेव्हा मी मोठी होत होते, तेव्हा मला आत्मविश्वास वाटण्यात अडचण येत होती, विशेषत: काही सौंदर्याच्या आदर्शांमध्ये फिट होण्याच्या दबावामुळे मला अडचण येत होती. मात्र मी मी आत्म-शोधाच्या रूपात फॅशनकडे वळले आणि जसजशी मी मोठी होत गेले, तसातसा सौंदर्य आणि फॅशनबद्दलचा माझा संबंध आणि समज विकसित होत गेली.

ती पुढे म्हणते , आता फॅशन हे फक्त चांगले दिसणे किंवा ट्रेंड्सचे पालन करणे नाहीतर फॅशन आता एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाला अभिव्यक्त करते. आज फॅशन आणि सौंदर्य हे असे माध्यम आहे ज्याद्वारे मी स्वतःला, माझ्या भावनिक कॅनवासला आणि माझ्या मनःस्थितीला अभिव्यक्त करू शकते.  मला फॅशनमध्ये नेहमी प्रयोग करायला आवडते, मी फॅशनसह मजा करू इच्छिते आणि मला वाटते की मी ते मनापासून करत आहे, म्हणूनच लोक माझ्या फॅशन-फॉरवर्ड बदलाची प्रशंसा करत आहेत असं भूमी म्हणाली.

महागाईत दिलासा! अत्यावश्यक 41 औषधांच्या किमती होणार कमी, सरकारचा मोठा निर्णय

भूमी पुढे म्हणते, लोक कोणालाही त्रास देतात आणि माझ्यासोबत देखील असे झाले. मी आतापर्यंत केलेल्या सर्व चित्रपटांमध्ये, मी एका छोट्या शहरातील मुलीची भूमिका केली आहे आणि त्यामुळे ही धारणा निर्माण झाली आहे की मी शेजारच्या मुलीसारखी दिसू शकते, मला चांगले वाटते की लोकांना अशाच प्रकारे मी आवडते. मात्र माझा फॅशन टर्न त्या धारणेला तोडण्यासाठी आहे आणि लोकांना दाखवण्यासाठी आहे की मी खरोखर कोण आहे आणि मी कशी दिसू इच्छिते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज