Download App

रील पडली महागात, 300 फूट खोल दरीत पडून अन्वी कामदारचा मृत्यू; जाणून घ्या सर्वकाही

Anvi Kamdar : ट्रॅव्हल पोस्टमुळे इंस्टाग्रामवर चर्चेत राहणारी अन्वी कामदार (Anvi Kamdar) हिचा रायगडमध्ये धबधब्यात पडून मुत्यू झाला आहे.

  • Written By: Last Updated:

Anvi Kamdar : ट्रॅव्हल पोस्टमुळे इंस्टाग्रामवर चर्चेत राहणारी अन्वी कामदार (Anvi Kamdar) हिचा रायगडमध्ये धबधब्यात पडून मुत्यू झाला आहे. ती मंगळवारी मंगळवेढा येथील प्रसिद्ध कुंभे धबधब्याजवळ (Kumbh falls) 300 फूट खोल दरीत व्हिडिओ बनवताना पडली.

माहितीनुसार, अन्वीला प्रवासाची आवड होती आणि तिने यालाच करिअर बनवले होते. तिचे इंस्टाग्रामवर (Instagram) दोन लाख 54 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. तिने सीएचे शिक्षण घेतले होते आणि काही काळासाठी तिने डेलॉइट नावाच्या कंपनीत कामही केले होते. तिच्या इंस्टाग्रामवर बायोमध्ये स्वतःची ओळख करून देत अन्वीने ‘ट्रॅव्हल डिटेक्टिव’ असे लिहिले आहे. अन्वीला फिरण्याची आणि चांगल्या ठिकाणांची माहिती देण्याची आवड होती.

या प्रकरणात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलै रोजी अन्वी कामदार रील शूट करताना 300 फिट खोल दरीत पडली. ती या धबधब्यावर सात मित्रांसह फिरायला गेली होती. मात्र तिथे रील बनवताना ती 300 फिट खोल दरीत पडली. या घटनेनंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी तात्काळ बचाव पथकाला माहिती दिली. तसेच तटरक्षक दलासह महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त मदत मागितली मात्र तरीही देखील अन्वीला वाचवता आले नाही.

Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या बारस्कर यांची गाडी जाळली

कोण होती अन्वी कामदार?

27 वर्षीय अन्वी मुंबईतील मुलंद भागात राहत होती. अन्वीला प्रवासाची आवड असल्याने ती इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवत होती. इंस्टाग्रामवर ती ट्रेवर ब्लॉग तयार करत होती. व्हिडिओमध्ये अन्वी तिचे अनोखे अनुभव तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत होती. कंटेंट क्रिएटर होण्यापूर्वी अन्वी डेलॉइट नावाच्या कंपनीत काम करत होती.

अन्वी कामदारच्या मृत्यूनंतर पर्यटकांना आवाहन

लोकांनी जबाबदारीने पर्यटनाचा आनंद घ्यावा. प्रवास करताना सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि पर्यटनस्थळी धोकादायक वर्तन टाळा असं आवाहन माणगावचे पोलिस निरीक्षक आणि तहसीलदार यांनी अन्वी कामदारच्या मुत्यूनंतर केला आहे.

Manorama Khedkar : मोठी बातमी! मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

follow us