Jalna Maratha Protest : ‘एक फुल अन् दोन हाप तुम्ही राजीनामा द्या’; उद्धव ठाकरेंची मागणी

Jalna Maratha Protest : जालन्यात घडलेल्या लाठीचार्जप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत पलटवार केला आहे. जालन्यातील अंतरवली चराटी गावात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज प्रकरणी एक फुल अन् दोन हाप यांनी राजीनामा देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी आंदोलकांशी भेट घेऊन सरकारवर टीका केली, त्या टीकेवर आज […]

Udhav Thackeray

Udhav Thackeray

Jalna Maratha Protest : जालन्यात घडलेल्या लाठीचार्जप्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत पलटवार केला आहे. जालन्यातील अंतरवली चराटी गावात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज प्रकरणी एक फुल अन् दोन हाप यांनी राजीनामा देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी आंदोलकांशी भेट घेऊन सरकारवर टीका केली, त्या टीकेवर आज मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी जोरदार टीका केली, त्यावर आता उद्धव ठाकरेंनी पलटवार केला आहे.

Jalna Maratha Protest : आरक्षण देणारचं! थोडा संयम ठेवा, केसेसही मागं घेणार; CM शिंदेंची ग्वाही

उद्धव ठाकरे म्हणाले, हे सरकार निर्घृणपणे काम करतंय, आंदोलकांना मी भेटलो आहे, त्यांच्यावर तुम्ही गोळीबार केला आहे. लाठीचार्जमध्ये शाळकरी मुलांनाही मारलं, लाठ्या आम्ही मारु का? एवढं साजूक तुम्ही वागता का? हे हास्यास्पद असून हे तीन तिघाडा काम बिघाडा सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

उद्या तलाठी परीक्षा होणारच, वेळेपूर्वी सेंटरवर हजर राहा; परीक्षा आयोजक संस्थेचा उमेदवारांना मेल

तसेच तुम्ही लाठीचार्जचा आदेश दिला नाहीतर तुमचा राज्याच्या गृह खात्यावर कंट्रोल नाही, प्रशासनावर वचक नाही,
मी मुख्यमंत्री असतानाही राज्यात अनेक आंदोलने मोर्चे निघाले होते, त्यामध्ये कुठेही लाठीमार झाला नाही, बारसूप्रकरणी तुम्ही माफी मागितली का? आत्ता तुमच्या अंगलट आल्याने तुम्ही माफी मागतायं? पहिली ठिणगी कोणी टाकली? आंदोलनात कुठेही पेटवा-पेटवीची गोष्ट घडली नव्हती. अचानक पोलिस आले आणि जरांगेंना घेऊन जात होते, तेव्हा बाचाबाची सुरु झाली. एका अधिकाऱ्याला फोन येताच लाठीमार सुरु झाला हा कुठला प्रकार? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान, ऐन गणेशोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे, या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करुन प्रश्न मार्गी लावावा, यामध्ये ओबीसी जनगणना, धनगर आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे.

Exit mobile version