Download App

Jalna Maratha Protest : लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता? मुख्यमंत्री शिंदेंनी सांगूनच टाकलं…

Jalna Maratha Protest : जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्जच्या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांची मालिकाच सुरु केल्याचं दिसून आलं होतं. काही नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाठीचार्जचे आदेश असा आरोप तर काहींकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.


सुप्रीम कोर्टातील नाहीतर हैदराबाद संस्थानातील आरक्षण द्या; मनोज जरांगेंनी सांगितला मराठ्यांचा इतिहास

जालन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. उपोषण केल्याने मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून उपचारासाठी दाखल होण्याबाबत विनंती केली होती. मात्र, जरांगे आपल्या मागणीवर ठाम असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विनंती करुन त्यांनी उपचारासाठी घेऊन जात असतानाच दगडफेकीची घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज केल्याचं दिसून आलं.

तुषार दोशींच्या जागी आता शैलेश बलकवडे जालन्याचे नवे एसपी, तात्काळ स्वीकारला पदभार

लाठीचार्जच्या घटनेनंतर आंदोलनकांवर लाठीचार्ज वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरुनच झाल्याचं सूर अनेक नेत्यांनी लावला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांनी आधी एकमत करुन आरोप करावेत, आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्याच्यानंतर माझ्यावरही आरोप करीत आहेत. तसेच अशा प्रकारचे आदेश आम्ही कसे देऊ शकतो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Sonia Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात दाखल

टिकणारच आरक्षण देणार :
मराठा समाज अर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे दाखवून द्यावं लागेल. काही लोकं म्हणतात या प्रवर्गातून द्या त्या प्रवर्गतून त्या पण मागास असल्याचं आधी आपल्याला सिद्ध करावं लागेल, त्यावर सरकार काम करीत आहे. आरक्षण मिळाल्यानंतर ते टिकलंही पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.

कुणबी दाखल्यासाठी समिती गठीत :
उच्चस्तरीय बैठकीत कुणबी समाजाच्या दाखल्या संदर्भात चर्चा झाली असून त्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त सचिव त्यावर काम करीत आहे. कुणबी मराठा दाखले मिळण्यास अडचण होतेयं, त्यांच्यासाठी समिती गठीत करण्यात आलीयं. मनोज जरांगे यांच्या दाखले देण्याच्या मागणीवर युद्धपातळीवर काम सुरु असून यासंदर्भात आमचे मंत्रीही त्यांच्याशी चर्चा करुन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

दरम्यान, विरोधकांकडून सरकारला बदनाम करण्याचं काम सरकारच्या स्थापनेपासून सुरु असून असे आदेश कधी दिले जातात का? मला यामध्ये राजकारण आणायचं नाही, आम्ही मराठा समाजाच्या पाठिशी, आधी आरक्षण दिलं होतं, त्यानंतर ते रद्द झालं त्याला कारणीभूत कोण आहे? जबाबदार कोण? या शब्दांत त्यांनी विरोधकांना धारेवर धरलं आहे.

Tags

follow us