धनंजय मुंडे असे काही बोलले असतील तर त्यांच्यासारखा नीच माणूस नाही, संतोष देशमुख (Deshmukh) यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर त्या धनंजय मुंडे इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा सोयरा असो, जर त्याने वाईट कृत्य केले असेल तर त्याचं समर्थन कधीच करू नये असा थेट घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. परळी येथे प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी वाल्किक कराड आपल्यात नाहीत अशी आठवण काढली त्यावर जरांगे यांनी वरील भाष्य केलं आहे.
अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडले पाहिजे. धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात? अजूनही अजित पवार यांचे डोळे उघडले तर बरे होईल. गोरं गरिबांचे मुडदे पाडणाऱ्यांना अजित पवारांनी, देवेंद्र फडणवीस यांनी किती पाठीशी घालायचं? असा थेट घणाघात जरांगे पाटील यांनी केला आहे. शब्दातून का होईना धनंजय मुंडे उघडे पडले आहेत, गुंडागर्दी, भ्रष्टाचार करणे, दारू पिऊन पोरांना त्रास देणे, त्यांच्या समाजातील काही लोकांना गुन्हेगारीकडे वळून, ब्लॅकमेल करून आपला संसार उभा करणं असंही ते म्हणालेत.
पण माझा सहकाही आज आपल्यात नाही, धनंजय मुंडेंना प्रचारसभेत कराडची आठवण
हे सगळं भयंकर पाप कराड करत होता, आणि धनंजय मुंडे हे गुंडगिरीमधून राजकारण उभं करत होते, असा माणूस अजिबात चांगला नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता डोळे उघडले पाहिजेत, नाहीतर तुम्हीसुद्ध धनंजय मुंडे यांच्या पापात खाक होताल, अशा इशाराच आता जरांगे पाटील यांनी दिला आहे आहे.
मुंडे काय म्हणाले?
जगतमित्र हे कार्यालय सर्वांसाठी खुलं असायचं, आताही हे कार्यालय सुरू आहे, पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. काही असेल नसेल, जगतमित्र कार्यालयामधून आपण गोरगरिबांना मदत करायचो, कार्यालय सुरू आहे, गोरगरिबांना मदत सुरू आहे, पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
