मला वाटत एकत्र राहिलं पाहिजे; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जय पवार यांचं मोठ वक्तव्य

बिल्डिंग पडली की मालकाला अटक होते. इंजिनिअरला होत नाही. हॉटेलला आग लागली की हॉटेल मालकाला अटक होते.

News Photo   2026 04 04T174432.566

मला वाटत एकत्र राहिलं पाहिजे; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जय पवार यांचं मोठ वक्तव्य

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे धाकटे सुपूत्र जय पवार हे बारामती पोटनिवडणूक, पवार कुटुंब आणि विमान अपघात अहवाल या विषयावर बोलले आहेत. ‘जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं. बारामतीकर या निवडणुकीत काय करणार हे सर्वांना माहित आहे’ असं जय पवार बोलले आहेत.

अजित पवारांशिवाय कधी लढावं लागेल असं इमॅजिन केलं होतं का? या प्रश्नावर जय पवार यांनी आयुष्यात कधीच असं इमॅजिन केलं नव्हतं’ असं उत्तर दिलं. यासह दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरही जय अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. या निवडणुकीकडे कसं बघता? किती आव्हानात्मक आहे? ‘मी जास्त काही बोलू शकणार नाही. मी भावनिक आहे. मला सगळ्यांसमोर बोलायच नाहीय. तसंच, तुम्ही पत्रकार परिषद घेणार होता. ती लांबणीवर जातेय.

राष्ट्रवादीतील वादावर पार्थ पवार पहिल्यांदा बोलले; सुनील तटकरे, पटेलांवर काय म्हणाले ?

काय कारण आहे? त्यावर जय बोलले की “काही कारण नाही. जे मुद्दे मला बोलायचे होते. ते रोहितदादांनी कव्हर केले. जो पर्यंत फायनल अहवाल येत नाही. तो पर्यंत उगाचच लोकांच्या मनात मतभेद करायचे नाहीत. जे काही आम्हाला वैयक्तीक वाटतं ते वाटतं पण मी फायनल अहवाल आल्यानंतरच बोलेन रोहित पवारांच्या भूमिकेला तुमचा पाठिंबा आहे का?. ‘मी फक्त एवढचं म्हटलं की माझे मुद्दे त्यांनी कव्हर केलेत असंही ते म्हणाले. मी त्या रोहित सिंहचे व्हिडिओ टाकले. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे.

बिल्डिंग पडली की मालकाला अटक होते. इंजिनिअरला होत नाही. हॉटेलला आग लागली की हॉटेल मालकाला अटक होते. मग इथे असं का होत नाहीय” असं जय पवार बोलले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर विचारलेल्या प्रश्नावर जय पवार बोलले की, माझं व्यक्तिगत काही नाही. मी खूप छोटा आहे. पार्थ असेल वहिनी असतील पक्षाचे ज्येष्ठ नेते ठरवतील विलिनीकरण व्हावं असं वाटतं का? या प्रश्नावर जय पवार बोलले की, कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. आम्ही परस्परांशी बोलतो. दादा गेल्यानंतर सगळं पवार कुटुंब एकत्र आलं. राजकारणाचा जो भाग आहे, त्यावर मी संभाषण करणं योग्य वाटत नाही. त्यावर पक्षातले वरिष्ठ नेते बोलतील.

Exit mobile version