… तर टायरात घालून मारा, दहा पिढ्या आठवल्या पाहिजे; बारामतीकरांना उपमुख्यमंत्री अजितदादांचा दम

Ajit Pawar : एका हॉस्पिटलचे उद्घाटलन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीकरांना इशारा दिला आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांनी सावित्री हॉस्पिटलचे उद्घाटन केले. यावेळी अजित पवारांनी बारामतीकरांशी (Baramati) संवाद साधत बेशिस्त वागणाऱ्यांना टायरात घालून मारा असे पोलिसांना निर्देश दिले आहे.
या वेळी अजित पवार म्हणाले की, काही काही जण चुका करत आहेत, रस्तायवर कचरा टाकत आहेत. जनावरे चरायला सोडत आहेत. मी त्यांना कृपा करुन सांगतो आता ती जनावर कोंडवड्यात घातली तर ठीक नाही ऐकलं तर त्यांना बाजार दाखवतो. आता जे मालक लोक आहेत त्यांना निर्वाणीचा इशारा देतो. ऐकलं तर ठीक ऐकलं नाही तर मालकांवर केसेस होतील. असं या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, कधी कधी मोटरसायकवाले इकडे तिकडे बघतात आणि हळूच राँग साईडने ओव्हरटेक करतात. असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाची असली तर त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजे. अजिबात नियम कोणीही तोडू नका, मग तो अजित पवार असो किंवा अजित पवाराचा कोणी नातेवाईक असेल. सर्वांना नियम सारखे आहे. मी जे करतो ते बारामतीकरांसाठी, सर्वांसाठी करतो. असं देखील अजित पवार म्हणाले.
मला प्रदेशाध्यक्षपद नको पण…, आमदार रोहित पवारांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा
तर मी अनेक ठिकाणी झाडे लावली आहे मात्र आता तिथे कोणी पण येत आहे, जनावरं खात आहेत पण तसं चालणार नाही. जिथे माणसांना बसायला केलं आहे तिथं एकजण मोटरसायकल घालून निवांत मांझी घालून लोकांसोबत गप्पा मारत बसला होता. गाडी वळवली आणि पोलिसांना सांगितले की, याची गाडी ताब्यात घे आणि याला चांगला टायरमध्ये घाल, मग तो म्हणतोय दादा चुकलं.