Download App

Jayant Patil : आंबेडकरांना विश्वासात घेऊनच निर्णय; जागा वाटपावर जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

  • Written By: Last Updated:

Jayant Patil : पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटील ( Jayant Patil ) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यादरम्यान जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट करत चर्चांना पुर्ण विराम दिला. तसेच त्यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत माहिती दिली.

भारतीय वंशाचा तरुण अमेरिकेच्या राजकारणात; कोण आहेत अश्विन रामास्वामी?

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट त्यांची लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाली. आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांसोबतही बैठका झाल्या आहेत. पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तीनही पक्षांमध्ये समन्वय झाला आहे. त्यामुळे येथे सात आठ दिवसांमध्ये आम्ही निष्कर्षापर्यंत येऊ. पण प्रकाश आंबेडकर यांना विश्वासात घेऊन हा निर्णय होईल.

मनोज तिवारीची क्रिकेटमधून निवृत्ती, एका गोष्टीचं व्यक्त केलं दुःख

तर रावेर लोकसभा या जागेसाठी तीनही पक्षांची साधक-बाधक चर्चा झाली. त्यामध्ये एकनाथ खडसे यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी निवडणूक लढवण्यास असमर्थता व्यक्त केली असल्याने तिथे पर्याय उमेदवार शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच लोकसभेच्या सर्व जागांवर महाविकास आघाडीची चर्चा झाली असून लवकरच यावर मत व्यक्त होणार आहे. पण अंतिम निर्णय हा प्रकाश आंबेडकर यांना विश्वासात घेऊन घेतला जाईल. असे यावेळी जयंत पाटील यांनी सांगितला.

दरम्यान या पत्रकार परिषदे अगोदर जयंत पाटील यांनी भाजपप्रवेशांच्या अफवांवर उत्तर देताना म्हटले होते की, काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही. जर माझ्या नावाच्या अशा प्रकारे चर्चा होत असेल तर चांगला आहे सर्वांनीच प्रसिद्ध द्यावी. कारण थोडी प्रसिद्ध मिळाल्याशिवाय लोकांसमोर जाण्याचा चान्स राहिलेला नाही. असं म्हणत जयंत पाटील यांनी आपल्या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर जणू एक प्रकारे उलट फासाचं टाकला आहे.

follow us