Video : तु्म्हाला परस्पर निर्णय घ्यायचा अधिकार नाही; पवारांसमोर बसून जयंत पाटील ढसाढसा रडले

Jayan Patil On Sharad Pawar Retirement :  आत्तापर्यंत पवार साहेबांच्या नावाने मतं मागतो. पक्षाला मतं पवार साहेबांमुळ मिळतात.  ते जर नसतील तर कुणाला घेऊन जनतेसमोर जायचं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या नावाने ओळखला जातो. त्यांना परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार नाही. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणं ही महाराष्ट्राची नाही […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 02T134042.988

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 02T134042.988

Jayan Patil On Sharad Pawar Retirement :  आत्तापर्यंत पवार साहेबांच्या नावाने मतं मागतो. पक्षाला मतं पवार साहेबांमुळ मिळतात.  ते जर नसतील तर कुणाला घेऊन जनतेसमोर जायचं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या नावाने ओळखला जातो. त्यांना परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार नाही. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणं ही महाराष्ट्राची नाही तर देशाची गरज आहे, असे ते म्हणाले आहेत.  मी त्यांना विनंती करतो की हा निर्णय मागे घ्यावा. हा निर्णय आम्हाला मान्य नाही, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.  यावेळी जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले आहेत.

त्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण केलं. अलीकडे त्यांनी भाकरी फिरवण्याची भाषा केली .पवार साहेब तुम्ही आम्हा सगळ्यांचे राजीनामे घ्या. ज्यांना तुम्हाला पक्ष चालवायला द्यायचा आहे त्यांना द्या. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही काम करु शकणार नाही. तुम्ही थांबणार असाल आम्हीही थांबतो. ज्यांना हा पक्ष चालवायचा असेल त्यांना चालवू द्या, असे ते म्हणाले आहेत.

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणांनंतर  सभागृहामध्ये शरद पवारांच्या नावाच्या घोषणांचा अक्षरक्षः पाऊस पडला आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार असे कार्यकर्ते म्हणत आहे. यानंतर अनेक नेत्यांना अश्रू अनावरदेखील झाले आहेत. धनंजय मुंडे हे देखील शरद पवारांच्या पाया पडले आहेत. यावेळी अजित पवार कार्यकर्त्यांना आवरता दिसून येत आहे. याशिवाय जयंत पाटील, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आदींसह राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते यावेळी पवारांच्या बाजूला स्टेजवर उपस्थित आहेत.

 

 

Exit mobile version