राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजर राहण्यासाठी ईडीकडून 10 दिवसांची मुदतवाढ मागितली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय. जयंत पाटील यांनी आज सांगलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
Video : ‘भाजपला नैतिकतेची शिकवणी पवार साहेबांसाठी कठीणच’.. फडणवीसांचा खोचक टोला
जयंत पाटील यांनी कुटुंबातील विवाह समारंभाचं कारण देत ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. पाटील यांनी याबाबत ईडीला पत्र लिलहिलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
शार्क टँकच्या अशनीर ग्रोव्हरकडून 81 कोटींचा घोटाळा, कसा केला घोटाळा वाचा ?
जयंत पाटील यांचा इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (IL&FS) संदर्भात समन्स बजावण्यात आले असून माझा याच्याशी कोणताही संबंध नाही आणि मी त्यांच्याकडून कधीही कर्ज घेतलेले नसल्याचंही ते म्हणाले आहेत.
Video : अखेर अजितदादांनी वचपा काढलाचं; म्हणाले, इथं रडण्यापेक्षा…
नोटीस मिळाल्यामुळे मी चौकशीला सामोरे जाणार असून एका हवालदाराने मला नोटीस दिली, असं म्हणत त्यांंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आलीय. IL & FS घोटाळ्याप्रकरणी जयंत पाटलांनी नोटीस बजावण्यात आलीय. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले आहे.
बुधवारी, ईडीने IL&FS च्या पायाभूत सुविधा विकास आणि फायनांन्स कंपनीच्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात तपास केला होता. या प्रकरणी मुंबईतील दोन लेखापरीक्षकांशी जोडलेल्या जागेची झडती घेण्यात आली. त्यामध्ये कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.