शार्क टँकच्या अशनीर ग्रोव्हरकडून 81 कोटींचा घोटाळा, कसा केला घोटाळा वाचा ?
शार्क टँकचे अशनीर ग्रोव्हर व त्याच्या पत्नीचे नाव एका घोटाळ्यात आले. या प्रकरणी या दोघांविरोधात दिल्लीत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आलाय. दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेने या दोघांविरोधात 81 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ग्रोव्हर दाम्पत्याने बनावट पावत्या बनवून भारत पे कंपनीच्या खात्यातून तब्बल 81 कोटी रुपये वळविले आहे. ही रक्कम दोघांनी त्यांच्या ओळखीतील व्यक्ती आणि नातेवाईकांच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप ठेवण्यात आले आहेत.
PHOTO : बॉबी देओला पहिल्याच नजरेत झाले प्रेम, पहा पत्नीचसोबतचे फोटो ….
जेव्हा ही कथित फसवणूक झाली तेव्हा अशनीरची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर भारत पे ची संयुक्त संचालक होती. तिच्यावर बनावट पावत्या बनवून पैशांचा व्यवहार केल्याता आरोप आहे. या प्रकरणात पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. तसेच अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Narayan Rane : ईडीच्या नोटीस साधू-संताना येत नाहीत…
अशनीर आणि त्याची पत्नी यांच्याशिवाय दीपक गुप्ता, श्वेतांक जैन आणि सुरेश जैन यांना आरोपी करण्यात आले आहे. दीपक गुप्ता हे त्यावेळी भारत पेमध्ये प्रशासन आणि लॉजिस्टिकचे प्रमुख होते. दीपक हा माधुरी जैनचा मेहुणा आहे. श्वेतांक हा माधुरीचा भाऊ आहे. तिसरा आरोपी सुरेश जैन हे माधुरी जैनचे वडील आहेत.
86 बनावट बिलांद्वारे 7.6 कोटी रुपये बनावट कंपनीला पाठवण्यात आले. बनावट व्यवहाराद्वारे 71.76 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. आरोपींशी संबंधित ट्रॅव्हल एजन्सींना बेकायदेशीर पेमेंट करणे. माधुरी जैन यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.