Jayant Patil resigns, Shashikant Shinde becomes new state president of Nationalist Sharad Chandra Pawar’s party : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये खांदेपालट करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता शशिकांत शिंदे यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे.
‘श्श… घाबरायचं नाही!’ गिरीश ओक अन् श्वेता पेंडसे यांची पुन्हा एक गुढकथा
शशिकांत शिंदे यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार सोपवण्यासाठी मंगळवारी 15 जुलै रोजी पक्षाची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यावेळी शशिकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. शशिकांत शिंदे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते विधान परिषदेचे आमदार आणि पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत. तसेच आक्रमक नेते अशी त्यांची ओळख आहे.
कॉंग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील माजी आमदार भाजपच्या गळाला; प्रवेशाचा मुहुर्तही ठरला
काय म्हणाले शशिकांत शिंदे ?
अजून नावं निश्चित नाही. जयंत पाटील, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घेतलेला निर्णय मान्य असेल. कारण प्रदेशाध्यक्ष पदासाठी सध्या माझ्यासह इतरही नावं चर्चेत आहेत. त्याबाबतचा निर्णय मंगळवारी होणाऱ्या पक्षाच्या सर्वसाधारण सभेत निर्णय होणार. जयंत पाटलांना केलेल्या कामाची तुलना होऊ शकत नाही. मात्र प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावाची निश्चिता अद्याप देखील झालेली नाही.
भारत अन् रशियाची मैत्री खुपली! अमेरिकेत भारत-चीन विरोधात बिल सादर, 500 टक्के टॅरिफचा प्रस्ताव