कॉंग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील माजी आमदार भाजपच्या गळाला; प्रवेशाचा मुहुर्तही ठरला

कॉंग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील माजी आमदार भाजपच्या गळाला; प्रवेशाचा मुहुर्तही ठरला

Ex Congress MLA Sanjay Jagatap Will Entered in BJP soon : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ऑपरेशन लोटस पुन्हा सक्रिय करण्यात आलं आहे. त्यामध्ये कॉंग्रेस, शरद पवार गट आणि अजित पवार गटातील लोक देखील सोडली जात नाही आहेत. त्यामध्ये आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक कॉंग्रेसचा माजी आमदार भाजपच्या गळाला लागला आहे.

कॉंग्रेसचा माजी आमदार भाजपच्या गळाला…

लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणारे हे माजी आमदार पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप आहेत. ते भाजपमध्ये जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशाची तारिख देखील निश्चित झाली आहे. 16 जुलै रोजी त्यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश पार पडणार आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नेते हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

MSCB घोटाळ्यात ED चं आरोपपत्र; रोहित पवारांची मात्र ठाम भूमिका, ‘फितुरीला थारा नाही…’

तर संजय जगताप यांच्याबाबत सांगायचं झालं तर ते विधानसभा निवडणुकीपासून कॉंग्रेसमध्ये नाराज आहेत. त्यांचा भाजप प्रवेश संग्राम थोपटेंसोबत होणार होता पण त्यावेळी स्थानिक भाजप नेत्यांनी विरोध केला होता. तर जागताप कुटुंबाचं कॉंग्रेमध्ये मजबूत स्थान आहे. त्यामुळे जगतापांच्या भाजप प्रवेशाने कॉंग्रेसला मोठा धक्का बसू शकतो. तसेच यामागे भाजपला पुरंदरसह बारामती लोकसभा मतदासंघात आपली ताकद वाढण्याची संधी आहे.

काय सांगता! AI च्या मदतीने मायक्रोसॉफ्टने वाचवले 50 कोटी डॉलर; कंपनीने नक्की काय केलं?

दरम्यान या अगोदर उत्तर महाराष्ट्रातील दोन माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये धुळ्याचे कॉंग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार अपूर्व हिरे हे देखील भाजपमध्ये गेले आहेत. 1 जुलै 2025 रोजी हा पक्ष प्रवेश पार पडला.

मी वस्त्रहरण करतो ते त्यांना टोचत; सभागृहातील हाश्यावर राऊतांचा फडणवीसांना टोला

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे. दुसरीकडे राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागलेले आहेत. त्यात अद्याप स्वतंत्र लढणार की, युती आणि आघाडी होणार हे देखईल स्पष्ट झालेलं नसल्याने अशा पक्षप्रवेशांचा धडाका भाजपसह इतर पक्षांनी देखील लावल्याचं पाहायला मिळत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube