Download App

जयंत पाटलांनी अजित पवारांच्या विकेट काढल्या; सरचिटणीस, जिल्हाध्यक्षांची केली हकालपट्टी!

Jayant Patil in Action : एकनाथ शिंदेंनंतर रविवार (दि. 2) रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर आज शरद पवारांनी आता आजच्या गुरूपौर्णिमेचा मुहुर्त गाठत थेट साताऱ्यातील कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला वंदन करत जनतेला एकप्रकारे सादच घातली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या शपथविधीला जाणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. ( Jayant Patil take a action on Ajit Pawar supportive office bearers)

नऊ मंत्र्यावरील कारवाईचे शरद पवारांकडून समर्थन, ‘जयंत पाटलांना निर्णय घेण्याचा अधिकार’

कोणा-कोणावर झाली कारवाई :

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या शपथविधीला जाणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये पक्षाचे सदस्यत्वावरून व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे त्याचबरोबर अकोला शहर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांना पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात आले आहे. त्यासंदर्भात तसे पत्रक काढले आहे.

अजित पवारांच्या बंडावर सुजय विखेंनी सावध भूमिका; म्हणाले यामुळे राज्यात…

काय आहे या पत्रांमध्ये?

सरचिटणीस शिवाजीराव गर्जे बडतर्फ

रविवारी 2 जुलै, 2023 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/ मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलात. आपले हे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. आपली कृती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत आहे. त्यानुसार आपणास पक्षाच्या सदस्यत्वावरुन व पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे. तसेच आपणास सूचित करण्यात येत आहे की, यापुढे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

अकोला शहर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख

रविवारी 2 जुलै, 2023 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/ मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलात. आपले हे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. आपली कृती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत आहे. त्यानुसार आपणास पक्षाच्या सदस्यत्वावरुन व अकोला शहर जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे. तसेच आपणास सूचित करण्यात येत आहे की, यापुढे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Tags

follow us