Download App

जयश्री जाधवांचं पक्ष सोडताच सतेज पाटलांबाबत मोठं विधान; म्हणाल्या, ‘त्यांना सांगण्याची गरज वाटली नाही’

मधुरिमाराजेंनी प्रचार केला त्यांच्या विरोधात प्रचार करणार काय? या प्रश्‍नावर महायुतीत गेल्यामुळे प्रचार करावा लागेल.

  • Written By: Last Updated:

Jayshree Jadhav on Satej Patil : काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी आपण पक्ष का सोडला यावर भाष्य करताना काँग्रेस नेते सतेज उर्फ बटी पाटील यांच्यावरही भाष्य केलं आहे. (Satej Patil) त्या म्हणाल्या, मी विद्यमान आमदार असतानाही कोल्हापूर उत्तरची उमेदवारी बदलताना मला विश्‍वासात घेतले नाही. आदल्या दिवशी रात्री उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या असा निरोप आला. मलाही कमी कालावधी मिळाला होता. मीही इच्छुक होते. आमदार सतेज पाटील यांनी थांबण्यासाठी सांगितले. मात्र, त्याचे उत्तर मिळाले नाही, त्यामुळे आज मी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला अस त्या म्हणाल्या.

काँग्रेसला डबल धक्का! रवी राजांनंतर विद्यमान आमदाराचाही पक्षाला रामराम; शिवसेनेत प्रवेश

आमदार जाधव म्हणाल्या, ‘पोटनिवडणुकीत माझा भाऊ म्हणून आमदार सतेज पाटील आणि राजघराणे माझ्या पाठीशी राहिले. मी त्यांचे ऋणी आहे. अण्णांचा (चंद्रकांत पाटील) कालावधी कोविडमध्ये गेला. त्यानंतर केवळ दोनच वर्षे मला मिळाली होती. त्यामुळे मी महिन्या-दीड महिन्यांपूर्वीच पुन्हा इच्छुक असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला तेव्हाही मी मुलाखत दिली. तेथे कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणार असल्यामुळे मी माघार घेतली. राजेश लाटकरांचे नाव निश्‍चित झाल्यावरही आम्ही स्वागत केले. ते घरी येऊन भेटून गेले. मात्र, त्यानंतर उमेदवारी बदलण्याच्या प्रक्रियेत मला सहभागी केले नाही.

तर समाजकारणाला पूर्णविराम

तुम्ही विजयी होण्यासाठी त्या मधुरिमाराजेंनी प्रचार केला त्यांच्या विरोधात प्रचार करणार काय? या प्रश्‍नावर महायुतीत गेल्यामुळे प्रचार करावा लागेल. त्यांचे माझे काही वैर नाही, असे जाधव म्हणाल्या. आमदार पाटील यांना कॉंग्रेस सोडत असल्याची कल्पना दिली काय? यावर जाधव म्हणाल्या, त्यांनी मला विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे त्यांना सांगण्याची गरज वाटली नाही. आम्ही हा निर्णय घेतला नसता तर आमच्या राजकरणाला, समाजकरणाला पूर्णविराम मिळाला असता.

आणखी फटाके फुटणार…

मंडलिक यांनी सांगितले की,शिवसेनेत उपनेत्या हे पद त्यांना दिले आहे. महिला सबलीकरणाचे काम त्या करतील. राजेश क्षीरसागर यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करतील. खासदार धैर्यशील माने, मी स्वतः राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज मुंबईत त्‍यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. दिवाळीनंतर जिल्ह्यात असे अनेक फटाके फुटणार आहेत.

follow us