काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आता मधुरीमाराजे रिंगणात…
Madhurimaraj Malojiraje Bhosale : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कॉंग्रेसन राजेश लाटकर (Rajesh Latkar) रिंगणात उतरवलं होतं. मात्र, त्यांच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांनी विरोध केल्यानं कॉंग्रेसने (Congress) हा मतदारसंघातला उमेदवार बदलला. राजेश लाटकर यांच्याऐवजी मधुरीमाराजे मालोजीराजे भोसले (Madhurimaraj Malojiraje Bhosale) यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली.
अखेर भाजपकडून मित्रपक्षांना न्याय!, आठवले, जानकर, राणा अन् कोरेंना प्रत्येकी 1 जागा
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत घमासान सुरू होतं. अखेर ही जागा कायम ठेवत काँग्रेसने विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा पत्ता कट करत राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. मात्र या उमेदवारीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवकांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली होती.
बारामतीकरांना भावनिक साद अन् विरोधकांवर आपल्या स्टाईलने फटकेबाजी, कन्हेरीमध्ये अजित पवारांची चर्चा
कॉंग्रेसने जाहीर केलेला हा उमेदवार आमच्यावर लादलेला आहे, या उमेदवाराने काँग्रेसमध्ये तसेच दिलेल्या मतदारसंघात कोणतंही भरीव कार्य केलं नाही, त्यांचा जनसंपर्कही दांडगा नाही, त्यांच्याकडे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व देखील नाही, हा उमेदवार बदलण्यासाठी फेरविचार करावा, या मागणीचं निवेदन पक्षाच्या 26 माजी नगरसेवकांनी रविवारी जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना दिलं होतं.
लाटकर यांना उमेदवारी दिल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली होती. दरम्यान, लाटकर यांच्या उमेदवारीला होणारा विरोध पाहून कॉंग्रेसने मधुरीमाराजे मालोजीराजे भोसले यांना उमेदवारी दिली. त्यामुळं कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश क्षीरसागर विरुध्द मधुरीमाराजे यांच्यात लढत होणार आहे.