अखेर भाजपकडून मित्रपक्षांना न्याय!, आठवले, जानकर, राणा अन् कोरेंना प्रत्येकी 1 जागा
BJP Seat Sharing: विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आतापर्यंत 146 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. तर भाजपने आपल्या मित्रपक्षांसाठी 4 जागा सोडल्याचं समोर आलं. बडनेरा, गंगाखेड, कलिना आणि शाहूवाडी हे मतदारसंघ भाजपने मित्रपक्षांसाठी सोडले आहेत.
बारामतीकरांना भावनिक साद अन् विरोधकांवर आपल्या स्टाईलने फटकेबाजी, कन्हेरीमध्ये अजित पवारांची चर्चा
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या तीन बड्या पक्षांशिवाय इतरही अनेक छोटे पक्ष महायुतीत आहेत. जागावाटपात अद्याप मित्र पक्षांना जागा न मिळाल्याने मित्र पक्ष नाराज होते. मात्र, आता भाजपने आपल्या कोट्यातील चार चार मित्रपक्षांना दिल्या. याबाबत भाजपने एक पत्रक जारी करत ही माहिती दिली. या पत्रकानुसार, बडनेराची जागा रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडण्यात आली. तर महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षासाठी गंगाखेड हा मतदारसंघ सोडण्यात आला. गंगाखेडमधून रासपकडून रत्नाकर गुट्टे रिंगणात असतील.
संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीला झटका; उमेदवाराचा निवडणूक लढवण्यास नकार
कलिना ही जागा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी सोडण्यात आली. आठवले यांनी कालिना विधानसभा मतदारसंघातून अमरजीत सिंह यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अमरजीत सिंग हे उत्तर भारतीय आहेत, ते आमच्यासोबतच राहतील असेही त्यांनी म्हटले. तर विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षासाठी शाहूवाडी मतदारसंघ सोडण्यात आला.
मित्रपक्षांना कोणत्या जागा सोडल्या?
गंगाखेड – राष्ट्रीय समाज पक्ष
कलिना-आरपीआय
साहुवाडी- जनसुराज्य पक्ष
बडनेरा – युवा स्वाभिमान पक्ष
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जानकरांनी महायुतीवर टीका करत 288 जागा स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता रासपला एक जागा सोडल्याने महादेव पुन्हा महायुतीत परतणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.