Download App

साईंची आरती करून बागेश्वर बाबाचा निषेध करणार, आव्हाड संतापले

मुंबई : महापुरुषांचा अवमान हा वाद पुन्हा एकदा राज्यात सुरु झाला आहे. यातच काही अध्यात्मिक धर्मगुरूंकडून देवतांचा अपमान केल्याच्या देखील घटना अलीकडच्या काळात घडल्या. दरम्यान धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shasri) उर्फ बागेश्वर बाबा यांनी शिर्डी (Shirdi) येथील साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आव्हाड हे आज ठाण्यातील वर्तक नगरमध्ये साईबाबांची आरती करून बागेश्वर बाबांचा निषेध करणार आहेत.

नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
बागेश्वर धामचे (Bageshwer Dham) प्रमुख बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जगविख्यात असलेले शिर्डी येथील साईबाबांविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. बाबा म्हणाले, साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही असं वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलेले आहे. तसेच कोणीही कोल्ह्याची कातडी धारण करून सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील, असंही धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, ‘या’ ठिकाणी घडली घटना

आधी वक्तव्य नंतर माफी
सतत वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत राहणार्‍या व प्रसिद्धीच्या खटाटोपापायी टीकेचे लक्ष्य होत असलेले बागेश्वर बाबा हे वादग्रस्त वक्तव्य करतात व टीकेची धनी झाले की माफी देखील मागतात. बाबांचा हा फॉर्म्युला आता सर्वानाच पाठ झालेला आहे. यापूर्वीही त्यांनी तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली होती. सर्वत्र संताप व्यक्त झाल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली होती.

क्रिकेट विश्वातून दुःखद बातमी, भारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचे निधन

दरम्यान बागेश्वर बाबांचा राज्यभरातून निषेध करण्यात आला. अनेक ठिकाणी या बाबांचे फोटो जाळण्यात आले तसेच निषेधार्थ घोषणा देखील देण्यात आल्या. त्यांच्या याच वक्तव्यावरून राजकीय वातावरण देखील तापले आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील बागेश्वर बाबा यांच्यावर शाब्दिक टीका केली होती. तसेच त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी आज ठाण्यातील वर्तक नगरमध्ये साईबाबांची आरती करून बागेश्वर बाबांचा निषेध करणार आहोत, असे आव्हाड म्हणाले आहे.

Tags

follow us