Jitendra Awhad : आप्पासाहेब धर्माधिकारींचं नाव बदनाम करु नका…

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे भाविक शिव्या घालताहेत, आता तुम्ही आप्पासाहेबांचं नाव बदनाम करु नका, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला दिला आहे. India Overtake China in Population: लोकसंख्येत भारत बनला अव्वल; चीनलाही टाकेल मागे महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेल्या उष्माघाताच्या घटनेनंतर आता राज्य सरकारकडून सारवासारव केली जात आहे. आता यापुढे दुपारच्या वेळेत कार्यक्रम […]

Jitendra

Jitendra

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे भाविक शिव्या घालताहेत, आता तुम्ही आप्पासाहेबांचं नाव बदनाम करु नका, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला दिला आहे.

India Overtake China in Population: लोकसंख्येत भारत बनला अव्वल; चीनलाही टाकेल मागे

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेल्या उष्माघाताच्या घटनेनंतर आता राज्य सरकारकडून सारवासारव केली जात आहे. आता यापुढे दुपारच्या वेळेत कार्यक्रम होणार नसल्याचं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केलंय.

Radhika Deshpande Post: “चार कागद, दोन सह्या, एक शिक्का”, मराठी अभिनेत्रीची मुख्यमंत्र्यांना टॅग करत संतप्त पोस्ट!

यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टोलेबाजी केलीयं. आप्पासाहेबांचे भाविक तुम्हाला शिव्या घालताहेत, आता तुम्ही आप्पासाहेबांचं नाव बदनाम करु नका, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

लोभाचा मुंबईकरांना फटका बसतोयं, आदित्य ठाकरेंची टीका

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, यापुढे कोणताही कार्यक्रम दुपारी 12 ते 5 या वेळेत कोणताही कार्यक्रम करु देणार नसल्याचं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. राज्य सरकार अपघात घडल्यानंतर अपघाताची रिपेअरिंग करतंय ही दुर्दैवी बाब असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

तसेच तुम्ही जबाबदारी अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर ढकलणार असाल तर हे दुर्दैवी आहे. आप्पासाहेबांचे नाव पुढे करुन त्यांच्यामागे तुम्ही लपू नका, त्यांचे भाविक तुम्हाला शिव्या घालत आहेत, आता तुम्ही आप्पासाहेबांचं नाव बदनाम करु नका, असा इशारा त्यांनी दिला आहे.

चाइनीज व्यक्तीने AI च्या माध्यमातून केली कमाल! मृत आजीचे बनवले वर्चुअल वर्जन

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. खारघर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला श्री सदस्यांची मोठी गर्दी उसळली होती. याचदरम्यान काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास जाणवल्याने सुरुवातीला सुमारे 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील उष्माघाताप्रकरणी विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. अशातच जितेंद्र आव्हाडांनीही या प्रकरणी टीका करत सरकारला धारेवर धरलंय.

Exit mobile version