Radhika Deshpande Post: “चार कागद, दोन सह्या, एक शिक्का”, मराठी अभिनेत्रीची मुख्यमंत्र्यांना टॅग करत संतप्त पोस्ट!
Radhika Deshpande: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही सिरीयलमधील अभिनेत्री राधिका देशपांडे (Radhika Deshpande) साकारत आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट (Instagram Post ) शेअर नुकतंच राधिकाने सरकारी अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर हल्लाबोल केला आहे.
अभिनेत्री राधिका देशपांडे (Share photos) ही सध्या ‘सियावर रामचंद्र की जय या बाल-महानाट्य’ प्रयोगामध्ये ती खूप व्यस्त आहे. त्यामुळे ती सध्या बालनाट्य शिबीराकरिता हॉल शोधण्यात गर्क आहे. महाराष्ट्र शासनाचा असलेला हॉल सवलतीच्या भावात मिळावा, याकरिता ती काही दिवसांपासून सतत प्रयत्न करत आहे. पण अधिकाऱ्यांच्या कामचुकार आणि बेजबाबदारपणाने तिला मोठ्या अडचणींचा सध्या सामना करावा लागत आहे.
View this post on Instagram
राधिकाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये धूळ खात असलेल्या काही फाईल्स आणि कागदपत्रांचा गठ्ठा असलेला फोटो शेअर केला आहे, या फोटोमधून बऱ्याच काही गोष्टी बघायला मिळाल्या आहे. तिने तो फोटो शेअर करताना त्या फोटोला कॅप्शन दिले आहे, कॅप्शनमध्ये राधिकाने सरकारी कामकाजावर मोठा संताप व्यक्त केला आहे.
काय आहे पोस्टमध्ये
चार कागद, दोन सह्या, एक शिक्का…….ताजे टवटवीत फोटो आहेत, फोटो फाईल्स मधून खेचून बाहेर काढले आहेत, खास व्हायरल मटेरियल आहेत त्यामुळे फिल्टर्स मारायची गरज नाही. तुमच्या फोन मधे दिसल्यावर पेस्ट कंट्रोल करून घ्या. “देश बदल रहा है, तरक्की हो रही है”, ती खास करून शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची. वाह! डोळ्यात पाणी आलं हो माझ्या दृश्य बघून. इतकी देखणी आरास मांडली होती, पायघड्या घातल्या होत्या माझ्या स्वागतासाठी.
विषय साधा होता. मी सध्या बालनाट्य शिबिर घेण्यासाठी हॉल शोधते आहे. मी आणि आमची संस्था काही मोठी नाही. सरकारी बाबू लोकांसमोर तर आम्ही चिल्लर पार्टी. थुकरट वाडीतील कोणीतरी “चल हट” म्हणून बाजूला करण्या जोगे. तसा फील देणारे एक्स्पर्ट मंडळी तुम्हाला भेटतील. तिथे पिसाळ आणि मोहिते आहेत त्यांनी मला उभं पण केलं नाही, बसा म्हणतील अशी अपेक्षा धरायला मी काही वेडी नाही. मूर्ख ठरू शकते कारण काम होईल अशी भाबडी आशा बाळगून मी गेले होते.
२४ मार्च ला अर्ज भरला, शिफारस केली, चकरा मारल्या पण दगडी माणसं सगळी, धुळीत काम करून मूठभर मास चढलेल्या माणसांवर काय परिणाम होणार? सध्या वरून कोणाचा आदेश पाळण्याची जबरदस्ती नाही, त्यासाठी खुर्चीचा आवाज होईल इतकी तरी हालचाल करावी लागते. असो.
आज १८ एप्रिल. शासनाचा असलेला हॉल सवलतीच्या दरात मिळावा असे वाटले होते.
दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या पुरस्कारांची घोषणा, आशा भोसलेंना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर
पण ना आपणहून कागद हलले, ना कधी मिळेल हे कळले, ना भाडं किती बसेल हे सांगण्यात आले. काहीच घडले नाही. नाकावरची माशी हलली नाही का भुवया उंचावल्या नाहीत. कोण घेईल तेवढे कष्ट! मुजोरी तर राजवाड्यातल्या तिजोरी एवढी. खूप पाहिलेत, खूप भेटलेत, पण ह्यांना माफी नाही. कामचोर, बेजबाबदार कर्मचाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. शासन केलंच पाहिजे.
मी माघार घेतला, हार मानली नाही. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार पण माझ्या सकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकावल्याशिवाय राहणार नाहीत.
*मुद्दाम नाव घेऊन लिहिते आहे. ही माझी बाजू आहे. गोष्टीची दुसरी बाजू असू शकते.
Madhuri Dixit: माधुरी, मुंबई अन् वडापाव; Appleचे सीईओ टीम कुकनेही मारला प्लेटवर ताव
चार कागद, दोन सह्या, एक शिक्का, असे तुमचेही अनुभव आहेत का? ढिगाऱ्यात कागद, सह्या, शिक्के, आशा, अपेक्षा, आकांक्षा खितपत, कुजत, खुंटीवर लटकलेले सापडतील. त्यांचीच रचलेली होळी तुम्ही पहायची, पेटणार नाही कारण पेट घ्यायला काटक्या, रॉकेल, काडीपेटी ते आणताहेत, पण वेळ लागेल. सोपं वाटलं काय! एक करा. सगळ्यावर पाणी फेरा, नाहीतर तोंड उघडा, शाब्दिक का असेना एक बुक्का नक्की हाणा. ~ राधिका देशपांड
अशी राधिकाने पोस्ट करत असताना महाराष्ट्र शासनाबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिपक केसकर यांसह अनेकांना टॅग करून धारेवर धरले आहे. त्यावर अद्याप कोणीही काही प्रतिक्रिया दिली नाही.