दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या पुरस्कारांची घोषणा, आशा भोसलेंना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर
This year’s Lata Dinanath Mangeshkar Award has been announced to Asha Bhosle : यंदाच्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची (Lata Dinanath Mangeshkar Award) घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle या यंदा हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आशा भोसले यांच्या बरोबर अभिनेत्री विद्या बालन, गायक पंकज उदास, अभिनेता प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
मंगेशकर कुटुंब हे गेल्या 33 वर्षापासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चालवत आहे. या मंगेशकर प्रतिष्ठानातर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांना दिग्गजांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाच्या या पुरस्कांराची घोषणा नुकतीच झाली आहे. दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 81 व्या स्मृतिदिनानिमित्त नुकतंच एक प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आलं. या प्रसिध्दी पत्रकारत या पुरस्काराविषयी माहिती देण्यात आली आहे. यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार लता मंगेशकर यांच्या भगिनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला. तर चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तर चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी अभिनेत्री विद्या बालन यांना देखील विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.
Nitesh Rane: नगरच्या आयुक्तांना मस्ती आली काय ? म्हणत राणेंची जीभ घसरली !
यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा येत्या 24 एप्रिल रोजी 2023 रोजी पार पडणार आहे. मुंबईतील सायन या ठिकाणी असणाऱ्या श्री ष्णमुखानंद हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
विशेष वैयक्तिक पुरस्कार – पंकज उदास (भारतीय संगीत)
सर्वोत्कृष्ट नायक – प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे गौरी थिएटर्सचे ‘नियम व अटी लागू’
श्री सद्गुरू सेवा संघ ट्रस्ट – (समाजसेवा)
वागविलासिनी पुरस्कार – ग्रंथाली प्रकाशन (साहित्य)
विशेष पुरस्कार – प्रसाद ओक (चित्रपट-नाट्य)
विशेष पुरस्कार – विद्या बालन (चित्रपट)