लोभाचा मुंबईकरांना फटका बसतोयं, आदित्य ठाकरेंची टीका

लोभाचा मुंबईकरांना फटका बसतोयं, आदित्य ठाकरेंची टीका

मुंबई महापालिकेच्या कामाकाजावर पुन्हा एकदा आमदार आदित्य ठाकरे यांनी ताशेरे ओढले आहेत. भ्रष्ट प्रशासन आणि सरकार आपला वाटा उचलत आहे, या लोभाचा मुंबईकरांना फटका बसत असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केलीय. ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट करत टीका केलीय.

झेंडा कपाळावर लावून फिरू का? ट्विटरवरून राष्ट्रवादीचा फोटो हटवल्याच्या प्रश्नांवर अजितदादा संतापले

आदित्य ठाकरे ट्टिटमध्ये म्हणाले, पुरवठादारांकडून खडीचा पुरवठा होत नसल्याने संपूर्ण मुंबईतील रस्त्यांची कामे रखडली आहेत. रस्त्यांसोबत पुलाची कामेही बंद पडल्याचं ऐकून धक्का बसला असल्याचं ते म्हणाले आहेत.

तसेच मुख्यमंत्री-भ्रष्टाचाऱ्याच्या जवळच्या वर्तुळातील कोणीतरी सर्व पुरवठादारांवर फक्त एका कंपनीद्वारे पुरवठा करण्यासाठी दबाव आणला आहे, म्हणूनच आता खर्च 50% पेक्षा जास्त झाला आहे, ज्यामुळे रस्ता/पुलाच्या खर्चात वाढ होणार असल्याचीही अनौपचारिकपणे चर्चा असल्याचं त्यांनी म्हटलंय.

अजित पवारांमुळं ‘आयाराम’ भाजप नेत्यांमध्ये चलबिचल!

त्याचप्रमाणे डेलिसल रोड ब्रिज आणि बीएमसीने हाती घेतलेली इतर रस्त्यांची कामे 31 मेच्या मुदतीपर्यंत पूर्ण होणार नाहीत. भ्रष्ट प्रशासन आणि सरकार आपला वाटा उचलत असल्याने आम्हा मुंबईकरांना त्यांच्या लोभाचा फटका बसत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेला नव्या रस्त्यांच्या कामाच्या टाईमलाईनवर आपलं स्पष्टीकरण देण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले आहेत.

अजितदादा बंड करणार का ?, राऊतांंनी केला मोठा दावा म्हणाले, आज सकाळी आम्ही..

याआधीही ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कामकाजासंदर्भात सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला होता. महापालिकेच्या अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यांनी अर्थसंकल्पावरही टीका केली होती. अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी नसून वर्षा बंगल्यावरून सरकारच्या कंत्राटदार मित्रांसाठी तयार करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

तसेच कंत्राटदारांसाठी वाढीव पैसा दाखवायचा, कंत्राटदारांसाठीच वाढीव पैसे खर्च करायचे हा राज्यातल्या घटनाबाह्य सरकारचा हेतू असल्याचंही ते म्हणाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube