अजितदादा बंड करणार का ?, राऊतांंनी केला मोठा दावा म्हणाले, आज सकाळी आम्ही..

अजितदादा बंड करणार का ?, राऊतांंनी केला मोठा दावा म्हणाले, आज सकाळी आम्ही..

Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) वेगळा निर्णय घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आज तर एका वृत्तपत्राने राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 40 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असून ते अजित पवारांसमवेत भाजप-शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त दिल्याने खळबळ उडाली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आज खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला.

राऊत म्हणाले, ‘महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांची आघाडी मजबूत आहे. याची भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. 2024 पर्यंत आघाडी खिळखिळी करण्याचा त्यांचा डाव आहे. शिवसेनेतून काही आमदार फोडले म्हणून शिवसेना फुटली का ?, आमदार गेले असतील. 20 ते 25 आमदार जाणं म्हणजे पक्ष खिळखिळा होणं असं नाही.’

Ajit Pawar : कुठलाही भूकंप सांगून येत नाही, बंडावर अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य

‘आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण पक्ष फुटला का ?, आजही शरद पवार या नावाबरोबर पक्ष बांधलेला आहे. 40 ते 50 आमदार फुटल्याच्या बातम्या येतात ते काही अंतिम सत्य नाही. माझी पक्की माहिती आहे की ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत त्या खोट्या आहेत. भाजपच या अफवा, वावड्या उठवत आहे. लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे काम करत आहे. पण तसे काहीही होणार नाही. आज सकाळी आम्ही शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केली आहे. तुम्ही जे काही आकडे सांगताय  ते कुठून आले मला माहिती नाही. एकाच वृत्तपत्राकडे हे आकडे कुठून येतात ते माहिती नाही, असे राऊत यावेळी म्हणाले.

10 जागा सुद्धा येणार नाहीत 

भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 प्लस आखण्यात आल्याचे समजते. यावर बोलताना राऊत म्हणाले, की ‘भाजपच्या 45 काय 10 जागाही निवडून येणार नाहीत. विधानसभेला महाविकास आघाडीच्या कमीत कमी 175 जागा निवडून येतील. कितीही आमदार फोडले, खासदार फोडले तरी राज्यातील जनता महाविकास आघाडीबरोबर राहिल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…मी काय अजित पवार यांचा प्रवक्ता नाही

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube