Awhad-Padalkar Dispute : विधान भवनात काल झालेल्या हाणामारीनंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट आहे. ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात तेथे अशा गोष्टी घडत असेल तर महाराष्ट्र कुठं चाललाय असं लोक आता म्हणत आहेत. या घटनेचे विधान सभेच्या आजच्या कामकाजावरही जोरदार परिणाम झाला. (Padalkar) येथे सर्वच आमदारांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, भाजप आमदार पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार आव्हाड यांचा वाद असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनाच सुनावलं आहे.
विधानसभा अध्यक्षांसमोर सभागृहात आमदार जितेंद्र आव्हाड आपली बाजू मांडतं होते. त्यावेळी ते दोन मिनीट बोलल्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी खाली बसण्यासाठी इशारा केला. मात्र, आव्हाड यांनी मला बोलुद्या म्हणत त्यांना विनंती केली. त्यावर अध्यक्षांनी तशी काही परवानगी दिली नाही. त्याचवेळी जयंत पाटील उठले आणि अध्यक्षांना उद्देशून इतकं गंभीर प्रकरण असल्याने त्यावर ते स्वत:ची बाजू मांडत आहेत. त्यांना तुम्ही बोलू दिलं पाहिजे अशी मागणी केली. त्यावरून अध्यक्ष बोलण्यापुर्वीच मुख्यमंत्री फडणवीस उभा राहिले.
मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
यावेळी फडणवीस जयंत पाटील यांना म्हणाले, या प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यातील दोषी असणाऱ्या लोकांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल. परंतु, या प्रकणात आता राजकारण करणं योग्य नाही. प्रत्येक ठिकाणी राजकारण हे काही बरोबर नाही. जयंतराव तुम्ही खूप ज्येष्ठ आहात. तुम्ही यात राजकारण आणू नका. कारण, लोक फक्त पडळकर किंवा आव्हाड यांनाच बोलत नाहीत तर पूर्ण सरकारलाच शिव्या घालत आहेत असंही मुख्यमंत्री फडणवीस यांवेळी म्हणाले.
प्रकरण काय?
काल विधान भवनात आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांचे कार्यकर्ते चांगलेच भिडले. यावेळी शिव्यांच्या भडीमारासह जोरदार हाणामारीही झाली. त्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्रभर वाऱ्यासारख पसरलं. त्यावरून पुन्हा आव्हाड पोलिसांमध्येही चांगलीच बाचाबाची झाली. आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्याला अटक केली म्हणून थेट ठिय्या आंदोलन केलं.