Download App

Jitendra Awhad : बागेश्वर महाराजांच्या मागे राजकीय सलाईन…

ठाणे : संत तुकारामांबद्दल बागेश्वर महाराज काहीही बोलतो आणि आपण ऐकून घेतो, बागेश्वर महाराजांच्या मागे राजकीय सलाईन असून मोठी राजकीय ताकद उभी असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

बागेश्वर महाराजांनी जगतगुरु संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता पुन्हा ‘बागेश्वर धाम सरकार’ म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम मीरा-भाईंदरमध्ये झाला.

सोहळा फडणवीसांप्रती पण कर्डिलेंनी अजित पवारांनाच धुतलं…

बागेश्वर महाराजांबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, हिंदू धर्मामध्ये वसुदेव कुटुंबकम हे वाक्य मोठं आहे. ज्या धर्मातील संतांना, चार्वाकांना, महानुभाव पंथाला, इतकंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना छळलं, त्यांच धर्मातला बागेश्वरचा आम्ही काय सत्कार करायचा का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

माझ्या संत तुकारामांबद्दल काहीही बोलता, अन् समाजातले लोकं काहीच बोलत नाहीत. त्यांच्या साधुसंतांबद्दल बोला बर काय होतं बघा, अशी मिश्किल टिप्पणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. तसेच आपण आपला महाराष्ट्र कुठे घेऊन चाललो आहोत, असंही ते म्हणाले आहेत.

Asim Sarode : ‘किरण रिजिजू हा माणूस मंत्री आहे, म्हणून काहीही बोललेले चालेल का?’

बागेश्वर महाराजा काही दिवसांपासून वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते. तसेच त्यांच्या नागपुरच्या कार्यक्रमात अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रकार होत असल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आरोपही केला होता. बागेश्वर महाराजांविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. तपासाअंती असा कुठलाही प्रकार समोर आला नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं.

त्यानंतर आता पहिल्यांदाच मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात बागेश्वर महाराजांचा कार्यक्रमा पार पडला आहे. त्यांच्या कार्यक्रमाला एका लाखांपेक्षा अधिक लोकांनी उपस्थित दर्शवल्याचं दिसून आलं होतं. त्यांच्या या कार्यक्रमावर जितेंद्र आव्हाडांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली असून आव्हाडांनी बागेश्वर महाराजांवर सडकून टीका केलीय.

Tags

follow us