Download App

टोपी घातल्याने कुणी गांधी होत नाही; आव्हाडांची हजारेंवर बोचरी टीका, दोघेही जोरदार ट्रोल

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad On Anna Hajare : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) हे सध्या देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. अण्णा हजारे यांनी साधलेल्या चुप्पीवरून विरोधी पक्षातील नेते त्यांच्यावर थेट टीका करू लागले आहेत. त्यावर अण्णा हजारे यांनी अद्याप उत्तरे दिली आहेत. आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) यांनी एक्सवर एक ओळ एक्सवर टाकत अण्णा हजारे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच अण्णा हजारे एक्सवर ट्रोल झाले आहेत.

राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना ‘हे’ आदेश…

‘ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले, टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही, अशा आशयाची ओळ जितेंद्र आव्हाडांची आहे. त्या खाली त्यांनी अण्णा हजारे यांचा एक फोटो टाकला आहे. त्यात अण्णा हजारे दोन्ही हात दाखवत व हसताना दिसत आहे. आव्हाडांच्या या ओळीनंतर अण्णा हजारे हे एक्सवर जोरदार ट्रोल झाले आहेत.

ह्याने देशाचे वाटोळे केले हे जरी मान्य असले तरी ह्या माणसा मागेजी शक्ती होती तेच खरे वाटोळे करणारे आहेत. समाधिस्त झालेल्या अण्णांना विनंती आहे. भाजपने देशभर जो धुमाकूळ चालवला आहे तो तरी बघायला जागे व्हा. उपोषण वगैरे पण नको, निदान साधी-सुधी टीका तरी कराल ? तुमच्या सोयीस्कर आणि संधीसाधू गांधीवादाची इतिहास नक्की दखल घेईल…! असा एकाने म्हटले आहेत.

शिवसेना, भाजपसोबत NCP चा डबल गेम?; पवारांवरील आरोपांनंतर आदित्य ठाकरे मैदानात

एकदम खरंय, गांधीजींनी अण्णा हजारेंपेक्षा जास्त खासकरून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे नुकसान केले.आज जर SC,ST लोकांना दोन मतांचा अधिकार असता तर हेमंत पाटील यांच्यासारख्या जातियवादी व्यक्तीने उच्चशिक्षित एका आदिवासी अधिष्ठाताला रुग्णालयातील स्वच्छतागृह साफ करायला लागले नसते…असे एकाने म्हटले आहे. अजी महाराज, वाटोळे कुणी केले हे साऱ्या जगाला माहीत आहे.. यांचे जे परमशिष्य परमादरनीय श्री केजरीवाल साहेब आणि त्यांचे खंदे बंदे यांनी दिल्लीची कशी वाट लावली ते माहीत आहे की नाही. आज तिघेही हवा खात आहेत जेल ची…असे एकाने म्हटले आहे.

तर जितेंद्र आव्हाडांनाही काहींनी सुनावले आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतः च्या अंतर्मनाला विचारा, तुमच्याकडून काय काय वाटोळे झाले देव देश धर्माचे ते… असे एकाने आव्हाडांना सुनावले आहे.

Tags

follow us