शिवसेना, भाजपसोबत NCP चा डबल गेम?; पवारांवरील आरोपांनंतर आदित्य ठाकरे मैदानात
Aditya Thackeray On Sharad pawar : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घेतला होता. या शपथविधी बाबत अद्याप अनेक गूढ कायम आहेत. अशाचत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मोठं विधान केलं. पवारांनीच 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सूचना केली होती, असं विधान केलं. दरम्यान, यावर आता उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाष्य केलं.
Harshvardhan Kapoor: ओल्ड ट्रॅफर्ड येथे डेनिस इर्विनसोबत हर्षवर्धन कपूरची अनोखी भेट
उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास नकार दिल्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात युती करण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यामुळे या राष्ट्रपती राजवटीत भाजपचा हात असल्याचं बोललं जात होते. पवारांनीही राष्ट्रपती राजवटीवरून भाजपवर टीका केली होती. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर फडणवीस यांनी आता धक्कादायक खुलासा केला. पवारांनीच 2019 मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सूचना केली होती. पवारांनी 2019 ला शिवसेना आणि भाजपसोबत डबल क्रॅास करण्याचा प्रयत्न केला, असं विधान त्यांनी केलं.
याबाबत आदित्य ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले की, यात खरं-खोटं काय ते माहिती नाही. मात्र, आम्हाला भापजचा अनुभव आहे. तो वाईट आहे. त्यांनी जे आम्हाला वचन दिलं होतं, ते त्यांनी मोडलं. भाजप सातत्याने खोटी बोलत आहे. त्यांनी देशाला आणि राज्याला अनेक वचनं दिली आणि मोडली. शिवसेना आणि भाजपसोबत डबल क्रॅास करण्याचा प्रयत्न केल्याचं भापज सांगत आहे. पण, ते आम्ही एकत्र येण्याआधीच राजकारण होतं. त्याकाळात सगळ्यांनीच सगळ्या राजकीय शक्यतांचा विचार केला. पण, राष्ट्रवादी – शिवेसेनेची आघाडी होण्याआधी, आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधीचं हे राजकीय डावपेच होते.
आदित्य म्हणाले, पण मुद्दा हा आहे की राज्यात महाराष्ट्र हिताचं महाविकास आघाडी सरकार असतांना हे सरकार तुम्ही का मोडलं? काही आमदार का फोडले, खोक्याचं राजकारण केलं? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केली. भापजही सांगायची की, आम्ही राष्ट्रवादी सोबत जाणार नाही. पण शेवटी भापजपवाले गेले राष्ट्रवादीसोबत. बदला, इगो जपण्यासाठी भाजप महाराष्ट्राला मागे घेऊन जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
आदित्य म्हणाले, शिवसेना मित्र म्हणून कठीण काळात कायम सोबत होती. मात्र, आता गरज संपल्यानं मित्र पक्षांना दुर केलं जातं. हेच का हिंदुत्व आहे का, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
नांदेडमधील शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या दूर्दैवी घटनेवरून त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, अशा घटना सातत्याने घडत आहेत. याआधी कळव्यातही अशीच घटना घडली होती. त्या घटनेतून सरकारने काहीही बोध घेतला नाही. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन नसणं, औषधं नसणं गुन्हा आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.