राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप ट्विटरवर शेअर केली आहे. ही ऑडिओ क्लिप ठाणे महापालिका सहआयुक्त महेश आहेर यांची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या ऑडिओ क्लिपवरुन आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
या ऑडिओ क्लिपमध्ये तो अधिकारी दारुच्या नशेत मुख्यमंत्र्यांना फोन करतो. आम्ही तर त्याला तुमच्यासाठीच अंगावर घेतला आहे. आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखालीच काम करतो, असेआहेरने मुख्यमंत्र्यांना म्हटल्याचे आव्हाड म्हणाले आहेत. या ऑडिओ क्लिपमधील काही संवाद आव्हाड यांनी ट्विट केले आहेत.
Nana Patole ; अमृता आमची सुनबाई, देवेंद्र लहान भाऊ पण गृहमंत्री म्हणून…
तसेच महेश आहेर स्वत: ह्या ऑडीओ क्लिपमध्ये बोलताना दिसतोय. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टता द्यावी की, दारू पिऊन आपल्याला कोणीही फोन करु शकतं का ? आणि बाहेर सांगू शकतं का ? की टाईट होऊन मी सीएम ला फोन केला, असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटेल आहे.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1637039158723239936?s=20
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आव्हाड यांनी अशीच एक ऑडिओ क्लिप ट्विट केली होती. त्यामध्ये आव्हाड यांच्या मुलीला व जावयाला मारण्याच धमकी देण्यात आली होती. ही ऑडिओ क्लिप महेश आहेर याची असल्याचा आरोप आव्हाडांनी केला होता. यानंतर आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी आहेर यांना मारहाण केली होती. त्यानंतर आव्हाड व त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात देखील आव्हाड यांनी महेश आहेर याचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.